Goa Stampede: लईराई जत्रा दुर्घटनेमध्ये काकू- पुतण्याचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Lairai Jatra tragedy Kauthankar family: लईराई जत्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत थिवी,अवचीत‌ वाडा येथील आदित्य कवठणकर (१७) आणि तनुजा कवठणकर (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला
Goa stampede deaths
Goa stampede deathsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: श्रीदेवी लईराईच्या जत्रोत्सवाच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांनी जीव गमावला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ८० लोकं यामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरु आहेत. ३ मे रोजी पहाटे झालेल्या या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील काकू व पुतण्याने जीव गमावल्याने कवठणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार लईराई जत्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत थिवी,अवचीत‌ वाडा येथील आदित्य कवठणकर (१७) आणि तनुजा कवठणकर (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघे नात्याने एकमेकांचे काकू आणि पुतण्या होत. आदित्यने यंदा इयत्ता दहावीचे वर्ष पूर्ण करून अकरावीत प्रवेश मिळवला होता आणि यावर्षी सलग दुसऱ्यांदा लईराई देवीच्या उत्सवात सहभागी झाला होता.

Lairai Jatra tragedy deaths
Lairai Jatra tragedy deaths Dainik Gomantak

या दोघांशिवाय सुर्या मयेकर, (साखळी), यशवंत केरकर (४०, माडेल, थिवी), प्रतिभा कळंगुटकर, (कुंभारजुवे) आणि सागर नंदरगे, (३०, माठवाडा, पिळगाव.) या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती उघड झालीये.

चेंगराचेंगरीचं कारण काय?

या घटनेबद्दल बोलताना प्रत्यक्षदर्शींनी पोलीस प्रशासनाचा दुर्लक्षितपणा, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने झालेली चेंगराचेंगरी आणि धोंडांच्या बेजबाबदारपणालाच प्रमुख कारण म्हटलं आहे.

Goa stampede deaths
Goa Stampede: शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 40 जण जखमी

पोलिसांची मोठी फौज तैनाद करून देखील काही क्वचित अधिकारीच घटनास्थळी उपस्थित होते, जखमी लोकांना स्थानिकांनी मदत करत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची धडपड केल्याचं शुभम आणि रामा नावाच्या धोंडांनी सांगितलं. श्रीदेवी लईराईची जत्रा हा गोव्यातील प्रसिद्ध उत्सव आहे आणि त्याला गालबोट लागू नये यासाठी योग्य व्यवस्थापनची गरज आहे असं स्थानिक म्हणतायत.

पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

गोव्यात घडलेल्या या अघटित प्रसंगावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून दुःख व्यक्त केलं, तसंच यामधील जखमी लोकांसोबत आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबासोबत प्रशासन कायम असल्याचं सांगत त्यांनी गोवेकरांना आधार दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्यासह अनेकांनी अपघातग्रस्तांची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com