Spices 29 Goan Indian Restaurant  facebook
गोवा

Spices 29 गोवन भारतीय रेस्टॉरंटने ऑस्ट्रेलियात जिंकला पुरस्कार

पुढील पुरस्कारासाठीही तयारी करणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Spices 29 Goan Indian Restaurant: गोमंतकीय व्यक्तींनी जगभरात आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. राज्यातील अनेक घरांतील पिढ्या सध्या परदेशांमध्ये सेटल झालेल्या आहेत.

विविध देशांमध्ये ते प्रगती करत आहेत, आणि त्या त्या देशांच्या प्रगतीतही हातभार लावत आहे. दरम्यान, काही काळापुर्वीच ऑस्ट्रेलियातील एका गोवन भारतीय रेस्टॉरंटने तिथे एक पुरस्कार जिंकला आहे.

Spices 29 Goan Indian Restaurant असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. नेल्सन फर्नांडिस, सेल्मा रोचा या हे रेस्टॉरंट चालवतात. या रेस्टॉरंटने बेस्ट इंडियन रेस्टॉरंट इन रिजनल न्यू साऊथ वेल्स कॅटेगरी हा पुरस्कार जिंकला.

न्यू साऊथ वेल्स रेस्टॉरंट अँड केटरिंग होस्टप्लस अॅवॉर्ड्स फॉर एक्सलन्सद्वारे हा पुरस्कार दिला जातो.

सेल्मा रोचा म्हणाल्या, ग्राहकांचा पाठिंबा, टीम वर्कमुळे व्यवसायासाठी चांगला दिवस आला आहे.

बिझनेस डायरेक्टर नेल्सन फर्नांडिस म्हणतात, गेल्या 5 वर्षांच्या व्यवसायात कर्मचाऱ्यांनी दाखवलेला उत्साह आणि समर्पण हे विजयासाठी सर्वात मोठे कारण ठरले आहेत. बीचेस हे सुंदर, संरक्षक आणि अमर्याद संधींचे ठिकाण असते.

मी 20 वर्षांहून अधिक काळ हॉस्पिटॅलिटी उद्योगात काम करते. ग्राहकांना स्वादिष्ट भोजन आणि उबदार सेवा देऊ शकलो, याचा मला नेहमीच आनंद वाटतो, असे नेल्सन यांनी सांगितले.

सेल्मा रोचा, रेस्टॉरंट मॅनेजर शिवांगी, मुख्य आचारी प्रवीण कुमार यांनी या यशानंतर आनंद व्यक्त केला. आम्ही नेहमीच सर्वोत्तम अन्न आणि सेवा देण्याचा प्रयत्न केला. आमच्या वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे हे गोड फळ आहे.

हा विजय म्हणजे एक आव्हान आहे. राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी तयारी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT