spicejet News
spicejet News  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport: मोपा विमानतळावर लवकरच स्पाईसजेट कंपनी सुरु करणार विमान सेवा

Rajat Sawant

Manohar International Airport: स्पाईसजेट कंपनीने मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. दिल्ली, कोलकत्ता व बंगळुरू येथे ही विमानसेवा 10 फेब्रुवारीपासून तर 2 मार्चपासून सेवा सुरू करण्यात येणार आहे. (Mopa International Airport)

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. या पार्श्वभूमीवर इंडिगो व गो फर्स्ट, एअरलाईन्स या तीन विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर अशा महत्वाच्या ठिकाणांवरुन येणारी आपली विमाने दाबोळीवरुन मोपावर विमान सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती.

स्पाईसजेट कंपनी दिल्ली व कोलकत्ता येथे 10 फेब्रुवारीपासून तर बंगळुरू येथे 2 मार्चपासून विमानसेवा सुरु करणार आहे.

'इंडिगो’कडून मोपा विमानतळावरून आठवड्याला 168 उड्डाणे होणार असून देशांतर्गत 8 स्थळांमध्ये हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT