barge Sank in Mormugao Port
barge Sank in Mormugao PortDainik Gomantak

Mormugao : मुरगाव बंदरात बुडाली बार्ज; तीव्र वाऱ्यामुळे दुर्घटना घडल्याची शक्यता

बार्जवरील सर्व आठ क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश
Published on

Mormugao : मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बाहेरील अँकरेजमध्ये अँकर केलेला बार्ज बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून 'रिओ मार्टिना 3' असे या बार्जचे नाव आहे. या बार्जमध्ये 8 क्रू मेंबर्स होते. जहाजावरील सर्व आठ क्रू मेंबर्सना आसपासच्या इतर बार्जने वाचवले आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

barge Sank in Mormugao Port
Mahadayi Water Dispute: गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावर काय म्हणाले गोव्यातील मंत्री, वाचा सविस्तर...

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बाहेरील अँकरेजमध्ये अर्धा लोड केलेला बार्ज ‘रिओ मार्टिना 3’ला जलसमाधी मिळाली आहे. बार्जमध्ये माल भरला जात होता परंतु जोरदार वाऱ्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. या बार्जमध्ये 8 क्रू मेंबर्स होते.

सुत्रांनी सांगितले की, जहाजावरील सर्व 8 क्रू मेंबर्सना आसपासच्या इतर बार्जने वाचवले. तीव्र वारा आणि जोरदार प्रवाहामुळे बार्जला समस्या आल्या असण्याची शक्यता आहे. तसेच इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे.

चालक दलातील सदस्यांना वाचवण्यात यश आले आहे परंतु अर्धा माल भरलेल्या बार्जला मुरगावच्या खोल समुद्रात जलसमाधी मिळाली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com