Pune Goa Flight Cancelled
पुणे: गोव्याला जाणारी फ्लाईट ऐनवेळी रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. स्पाईसजेट कंपनीची एसजी-१८५ फ्लाईट गुरुवारी (२३ जानेवारी) गोव्याला उड्डाण घेण्यापूर्वी अचानक रद्द केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट कंपनीची फ्लाईट १२.२० वाजता पुण्यातून गोव्यासाठी उड्डाण घेणार होती. दरम्यान, अकरा वाजता कंपनीने अचानक रद्द करण्यात आली. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यातील एका प्रवाशाने विमान कंपनीकडून ऐनवेळी फ्लाईट रद्द झाल्याचा फोन आला, अशी माहिती दिली आहे.
विमानतळावरील स्पाईसजेटच्या हेल्पडेस्कला माहिती विचारली असता त्यांनी प्रवाशांना प्रवासभाडे परत केले जाईल, अशी माहिती दिली. काही पर्यटकांनी गोव्यात पर्यटनाचा प्लान केला होता मात्र, उड्डाण ऐनवेळी रद्द झाल्याने त्यांच्या प्लॅन फिसकटला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
स्पाईसजेटने फ्लाईट रद्द का केली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोलकता येथील हवामान खराब असल्याने अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे ते गोवा (एसजी-१८५) फ्लाईट देखील रद्द करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
पुणे ते दिल्ली जाणाऱ्या फ्लाईटला देखील जवळपास आठ तास विलंब झाला. दुपारी ३.२० वाजता शेड्युल करण्यात आलेली फ्लाईटने रात्री ११.३० वाजता उड्डाण घेतले. यामुळे देखील प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.