Sea Food Goa: शॅकवर अस्सल रुचिक फिश-थाळी हवीच...! खवय्यांची पहिली पसंत; मत्स्याहारींच्या जीभेवर रेंगाळते गोवन चव

Goan Food Culture: गोवा जितका समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक तो इथे खवय्यांना भुरळ घालणाऱ्या अस्सल गोवन फिश-थाळीमुळे लोकप्रिय आहे.
Goan Food: शॅकवर अस्सल रुचिक फिश-थाळी हवीच! खवय्यांची पहिली पसंत; मत्स्याहारींच्या जीभेवर रेंगाळते गोवन चव
Best Fish In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

योगेश मिराशी

म्हापसा: गोवा जितका समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक तो इथे खवय्यांना भुरळ घालणाऱ्या अस्सल गोवन फिश-थाळीमुळे लोकप्रिय आहे. काही पर्यटक गोव्यात मुद्दाम केवळ फिश थाळीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. गोव्यात येऊन फिश थाळीचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीच माघारी जात नाही. मुळात इथे येऊन फिश-थाळी खाल्ली नाही, म्हणजे आग्य्राला जाऊन ताजमहल बघितला नाही, असे काहीसे फिश-थाळीचे समीकरण आहे. गोव्यातील सर्वच लहानशा खोपीपासून, हॉटेल, हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये तसेच शॅकमध्ये दुपारच्या वेळी अस्सल हुमणाची फिश थाळी मिळते.

गोव्याची अस्सल फिश-थाळीची चव पर्यटकांच्या जिभेवर कामयस्वरुपी राहावी, या हेतूनेच गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने समुद्रकिनाऱ्यांवरील सर्वच शॅकमध्ये फिश करी-राईस देणे बंधनकारक केले आहे. जो किनारी राज्याचा एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सर्वच शॅकवर दुपारच्या वेळी अस्सल रुचिक गोवन फिश-करी दिली जाते. पर्यटकांना या फिश-करीची भुरळ पडतेच.

Goan Food: शॅकवर अस्सल रुचिक फिश-थाळी हवीच! खवय्यांची पहिली पसंत; मत्स्याहारींच्या जीभेवर रेंगाळते गोवन चव
Goan Food Culture: गोव्याचा पाव, शेजारील राज्यातही खातोय भाव! म्हापसा बाजारपेठेतून मुंबई, बंगळुरुसह अन्य शहरांत पुरवठा

गोव्यातील (Goa) शॅक हे समुद्रकिनारा व संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. याच किनाऱ्यालगत असलेल्या शॅक समुद्रकिनाऱ्यावर खुल्या हवेत बसण्याची सुविधा देतात. त्यांच्या पायाखालील वाळू व समुद्राचा विहंगम दृश्यांसह पर्यटक त्यांच्या जेवणाचा आनंद घेऊ शकतात. किनारीपट्ट्यातील काही ‘नीज गोंयकर’ जे शॅक चालवायचे, ते नेहमीच दुपारच्या वेळी फिश करी-राईस द्यायचे. मध्यंतरी बिगर गोमंतकीय जे शॅक चालवू लागले, ते फिश-करी उपलब्ध करून देत नव्हते, अशा तक्रारी वाढू लागल्या होत्या. याची दखल घेत राज्य सरकारने २०२३ मध्ये सर्वच शॅकमध्ये ‘फिश करी-राईस’ पर्यटकांना उपलब्ध करून अनिवार्य केले होते.

शॅकवर सर्व प्रकारचे फिश-थाळी मिळतात. स्पेशल थाळी, नॉर्मल थाळी, किंगफिश थाळी, चणक थाळी असतेच. स्पेशल थाळीत सुंगटाचे हुमण, भात, दोन भाज्या, पापड, त्यादिवशी उपलब्ध असलेले मासे तळून दिले जातात. तसेच सोलकडी, कोशिंबीर असते. जरी सरकारने फिश करी-राईस अनिवार्य केले असले तरी पूर्वीपासून शॅकमध्ये ते उपलब्ध करून दिले जात होते. आम्ही यापूर्वी, आता व यापुढेही ग्राहकांना (Customers) अस्सल गोमंतकीय फिश-थाळी जेवू घालतो. कुठेच तडजोड करत नाही. गोमंतकीय जेवणासोबत इतर नॉर्थ इंडियन व चायनीज मेनू असतो. ग्राहक आपल्याला हवे ते जेवण मागवतात.

जॉन लोबो, शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे सरचिटणीस

Goan Food: शॅकवर अस्सल रुचिक फिश-थाळी हवीच! खवय्यांची पहिली पसंत; मत्स्याहारींच्या जीभेवर रेंगाळते गोवन चव
Goan Sea Food: 'सी फूड' लव्हर आहात? मग 'गोव्या'तील या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

जे ‘नीज गोंयकार’ शॅक चालवतात, ते जेवणाच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाहीत. शॅकची खासियत ही फिश करी-राईस व थंडगार बिअर असते. आम्ही फिश करी-राईस सर्व्ह करतो. टायगर सुंगटा, मसालो बांगडो, इसवण, पापलेट, लेफो आदींचा सहभाग असतो. मागणीनुसार मासळी उपलब्ध करतो. मध्यंतरी किनाऱ्यावरील शॅकमध्ये केवळ उत्तर भारतीयच जेवण मिळते, हा गैरसमज पसरला होता. ज्यात तथ्य नव्हते.

- शिरीन, शॅकमालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com