Spice products worth three lakhs seized from Margaon in raid of weights and measures department Dainik Gomantak
गोवा

वजन व माप खात्‍याच्‍या धाडीत मडगावातून तीन लाखांची मसाल्‍याची उत्‍पादने जप्‍त

एकूण १२ हजार मसाल्‍यांचे पॅकेटस्‌ जप्‍त

दैनिक गोमन्तक

दिवाळी ताेंडावर आलेली असताना मोठ्या प्रमाणावर मांडप-नावेली येथील एका गोदामात साठवून ठेवलेली सुमारे तीन लाखांची सुहाना मसाल्‍याची उत्‍पादने आज वजन व माप खात्‍याने घातलेल्‍या धाडीत जप्‍त केली. या उत्‍पादनावर वजनाचा उल्‍लेख स्‍पष्‍टपणे केला नव्‍हता, अशी माहिती देण्‍यात आली आहे.

दक्षिण गोव्‍याचे वजन व माप खात्‍याचे सहाय्‍यक नियंत्रक नितीन पुरुशन यांच्‍या देखरेखीखाली या खात्‍याचे निरीक्षक भूपेंद्र देसाई, ॲझन रॉड्रीगीस यांनी ही कारवाई केली.

एकूण १२ हजार मसाल्‍यांचे पॅकेटस्‌ जप्‍त करण्‍यात आल्‍याची माहिती या अधिकार्‍यांनी दिली. ही अशी कारवाई यापुढेही चालूच राहील अशी माहिती पुरुशन यांनी दिली. वजन व माप खात्‍याचे मुख्‍य नियंत्रक अरुण पंचवाडकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT