फेरीबोट शुल्क, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कला अकादमी, इफ्फीबाबत अपडेट; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Breaking News: पणजी, मडगाव, म्हापसा आणि महत्वाच्या शहरांमधील ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 07 November 2023
Goa Live Updates 07 November 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचे सहा बॉक्सर अंतिम फेरीत

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या सहा बॉक्सरनी अंतिम फेरी गाठली आहे. यामध्ये पुरुष गटात आकाश गोरखा, रजत, लोकेश, गौरव चौहान यांचा, महिलांत साक्षी चौधरी, सनामाचा चानू यांचा समावेश आहे. जमीर रोशन, साई आयुष व निहारिका उपांत्य फेरीत पराभूत, त्यामुळे त्यांना ब्राँझपदक.

लगोरीत नमन सावंतने गोव्यासाठी पटकावले सुवर्णपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लगोरीमध्ये गोव्याच्या नमन सावंतने पटकावले सुवर्णपदक

डेमो गेममधील खेळाडूंना देखील कॅश प्राईस

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डेमो गेममध्ये (उदा. लगोरी, मिनी गोल्फ, गतका) यात पदक मिळवलेल्या स्पर्धेकांना देखील गोवा सरकार कॅश प्राईस देणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी केली आहे.

जिंवत काडतुसासह मुंबईला प्रवास करण्याचा प्लॅन, बुलढाण्याचा युवक दाबोळी विमानतळावर ताब्यात

बॅगमधून जिवंत काडतूस घेऊन जाणाऱ्या 21 वर्षीय युवकाला दाबोळी विमानतळावर अटक करण्यात आली आहे. युवक मुंबईला प्रवास करणार होता, दरम्यान गेटवर तपासणीवेळी त्याच्या पाकीटात एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

फेरीबोट शुल्कवाढसंदर्भात काँग्रेसचा भाजपावर निशाणा

फेरीबोटीतून ये-जा करणार्‍या दुचाकींना दहा रुपये व चारचाकींसाठी झालेली संभाव्य तिकीट दरवाढ करण्याचा निर्णयाचा काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, पाच-दहा रुपये लोकांकडून वसूल करण्याची वेळ सरकारवर आल्याने भाजपा सरकारला भिकेचे डोहाळे लागलेत का?

असा सवाल करीत येत्या १६ तारखेपर्यंत हा प्रस्ताव सरकारने मागे न घेतल्यास काँग्रेसकडून नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा दिला जाईल, असा सज्जड इशारा उत्तर गोवा काँग्रेस जिल्हा समितीने दिला.

इफ्फीच्या ओपनिंगला बॉलिवूडचा भाईजान 'सलमान खान' लावणार हजेरी

गोव्यात होणाऱ्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन समारंभाला बॉलिवूडचा भाईजान अभिनेता 'सलमान खान' हजेरी लावण्याची शक्यता आहे. सलमान खानने मात्र याबाबत अद्याप उपस्थिती निश्चित केलेली नाही.

दिवाळीच्या तोंडावर सामान्यांसाठी खूशखबर..! कांदा स्वस्त होण्याचे संकेत. कांद्याचे दर दहा रुपयांनी उतरले. नवीन कांदा बाजारात दाखल.

शेळपे म्हापसा येथे उतारावर सिलिंडरवाहू टेम्पोचा अपघात

सेंट जेरोमवाडो, शेळपे म्हापसा येथे उतारावर सिलिंडरवाहू टेम्पोचा ब्रेक निकामी. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या बाजूला नेल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. गाडीत ७० पेक्षा अधिक भरलेले गॅस सिलिंडर होते. अपघातामुळे एका संरक्षक भिंतीचे नुकसान

मडगावच्या लीगल मेट्रोलॉजी विभागाने दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सुमारे तीन लाख रूपयांची सुहाना मसाल्याची पाकिटे जप्त केली आहेत. योग्य वजनमापात या मसाल्याचे पॅकिंग करण्यात आले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

कला अकादमीचा नवा मंच पाहतील तेव्हा त्यांना 'शाह जहान'चा 'ताजमहाल' दिसेल!

जुलै 2023 मध्ये कला अकादमीच्या खुल्या मंचाचा स्लॅब कोसळला होता. यानंतर सरकारच्या आणि मंत्री गावडेंच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी शाह जहानचा ताजमहाल कोसळला, असे म्हणत विजय सरदेसाईंनी गावडेंवर उपहासात्मक टीका केली होती.

यावर गावडे पलटवार करत म्हणाले की, 'जेव्हा ते सभागृहात बसतील आणि मी काय केले ते पाहतील तेव्हा त्यांना कळेल. तेव्हा त्यांना 'शाह जहान'चा 'ताजमहाल' दिसेल!

खरंतर त्यांनी माझ्यावर टीका केली हे एका अर्थाने चांगलेच झाले. कारण त्यांच्या टिकेमुळे मला प्रसिद्धी मिळाली.

हरमल पेडणे भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या व सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून स्वेच्छा जनहित याचिका दाखल. त्यामुळे बेकायदा बांधकामे व हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्स येणार अडचणीत.

गिरकरवाडा हरमल येथील बहुमजली बेकायदा बांधकाम पाडण्याचा खंडपीठाने निर्देश दिल्यानंतर ही दखल घेतली आहे.

राज्यात सर्वप्रथम राजधानी पणजीतील वीज ग्राहकांना मिळणार स्मार्ट मीटर्स

राज्यातील वीज ग्राहकांना आता राज्य सरकारच्या वीज खात्याकडून स्मार्ट मीटर देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरची व्यवहार्यता तपासण्यासाठी वीज विभागाने सल्लागाराची नियुक्ती केली होती.

त्यानंतर आता ही प्रीपेड स्मार्ट मीटर बसवली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 396 कोटी खर्च येणार आहे. दरम्यान, राज्यात सर्वप्रथम राजधानी पणजीतील वीज ग्राहकांना ही स्मार्ट मीटर्स मिळणार आहेत.

म्हापसा-शिवोली रस्त्यावर टेम्पो कलंडला

म्हापसावरून शिवोलीच्या दिशेला जाणाऱ्या टेम्पोचा अपघात. मार्ना येथील उतारावर ब्रेक फेल झाल्याने टेम्पो कंपाऊंड तोडून कलंडला. टेम्पो जरा पुढे गेला असता तर तो सरळ एका घरात घुसला असता.

दरम्यान, प्रसंगावधान राखून चालत्या वाहनातून उडी मारल्याने ड्रायव्हरचा जीव वाचला. या टेम्पोमध्ये किराणा सामान होते. यामधील सामानाचे आणि वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सतत होणारे अपघात पाहता परिसरातील लोकांची PWD कडे संबंधित रस्त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी

धुळापी - खोर्ली येथील सातेरी देवस्थानचे बेकायदा बांधकाम तीन महिन्यात पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा पंचायतीला आदेश. निवाड्यानंतर आदेशाला स्थगिती देण्याची केलेली विनंती खंडपीठाने नाकारली.

आता जेईई मेन किंवा NEET परीक्षेतून B.Pharm अभ्यासक्रमासाठी प्रवेश; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) विद्यार्थ्यांसाठी एक स्मरणपत्र जारी केले आहे. त्यानुसार 2024-25 पासून गोवा कॉमन एंट्रन्स टेस्ट (GCET) बंद करण्यात आल्यामुळे BPharm अभ्यासक्रमासाठीचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई-मेन 2024 किंवा NEET 2024 परीक्षेतून होतील .

राज्यात 2024-25 मध्ये फार्मसी विषयातील बीफार्म पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश जेईई-मेन 2024 किंवा एनईईटी 2024 या परिक्षांमध्ये भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयांतील सर्वोत्तम एकूण गुणांच्या आधारे केले जातील.

गोव्यात नोव्हेंबरमध्ये होणार बीअर फेस्ट, हेरिटेज कॉन्सर्ट

गोव्यात ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर विविध महोत्सव, कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागते. सध्या गोव्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

त्यानंतर 20 नोव्हेंबर पासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू होईल. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यातच गोव्यात बीअर फेस्ट आणि हेरिटेज कॉन्सर्टदेखील होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com