Accident  Dainik Gomantak
गोवा

Accident in Sancoale: 6 वर्षाच्या चिमुरड्याचा रस्ता ओलांडताना अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी अंत

सांकवाळ महामार्गावर बिट्स पिलानीजवळ अपघात

Akshay Nirmale

Accident in Sancoale : सांकवाळ येथे महामार्गावर बुधवारी संध्याकाळई भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुरड्याला धडक दिली होती. या अपघातातील चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

कुंदन ध्यानेश्वर राठोड असे या चिमुरड्याचे नाव असून तो सहा वर्षांचा होता. तो झरी-झुआरीनगर येथील राहात होता.

बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुंदन हा त्याच्या अन्य लहान मित्रांसोबत बिट्स पिलानी येथील महामार्ग ओलांडत असताना भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली.

कपिल बेटगिरी असे या कारचालकाचे नाव आहे. या धडकेत कुंदन गंभीर जखमी झाला होता.

त्याला चिखली येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT