Goa Verna IDC Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: झोपेत असताना काळाचा घाला, वेर्णा IDC मध्ये बसने चिरडल्याने बिहारच्या 4 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी

Goa Verna IDC Accident Case: बस चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

Pramod Yadav

Goa Verna IDC Accident Case

वेर्णा औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघातात बसने चिरडल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला असून, पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. २६ मे) रात्री अकरा वाजता हा अपघात झाला.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्या शेजारील झोपड्यावर चढली आणि झोपेत असलेल्या चार निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रोझ बर्गर या कंपनीतील कामागारांना घरी सोडण्यासाठी एक खासगी बस निघाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्या शेजारीवर शेडवर गेली.

यात तीन शेड जमीनदोस्त झाली व यातील नऊ कामगार गंभीर जखमी झाले. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून. पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

Goa Verna IDC Accident Case

अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. जखमींना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Goa Verna IDC Accident Case

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत आणि जखमी कामगार मूळ बिहारचे असून, महामार्गावरील विविध बांधकामासाठी काम करतात. अपघातात चालक आणि बसमधील कंपनीचे काही कर्मचारी देखील जखमी झालेत.

दरम्यान, बस चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT