Traffic Rule Violation Dainik Gomantak
गोवा

Traffic Police: गोव्यात 'ओव्हरस्पिडिंग' विरोधात धडक मोहीम! स्पीडगन रडार तैनात, 500 चालकांना नोटिस

Traffic Police Action: राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच पुलाच्या ठिकाणी हे स्पीड गन रडार तैनात करण्यात येऊन वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्यांना घरपोच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर वेगमर्यादा दर्शक फलक नसल्याने अनेक वाहन चालक सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याने वाहनावरील त्यांचा ताबा सुटून अपघात घडत आहेत. यामध्ये स्वयंअपघातचे प्रमाण अधिक आहे.

त्यामुळे वाहतूक पोलिस कक्षातर्फे राज्यभर वेग उल्लंघनविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५०० वाहन चालकांविरुद्ध नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अधिक प्रकरणे वास्को व पणजी वाहतूक पोलिस कक्षाच्या क्षेत्रातील आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

राज्यातील सर्व वाहतूक पोलिस कक्षांना प्रत्येकी एक ‘स्पीड गन रडार’ देण्यात आले आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच पुलाच्या ठिकाणी हे स्पीड गन रडार तैनात करण्यात येऊन वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्यांना घरपोच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिशीसोबत स्पीड गन रडारने टिपलेले वाहनाचे चित्र, वेळ तसेच तारीख व नोंद झालेला वेग याची माहिती देण्यात येत आहे.

एखाद्याला काही शंका असल्यास त्याची माहिती संबंधित वाहतूक पोलिक कक्षात जाऊन पाहता येईल. ही मोहीम सुरूच राहणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास ५ हजाराचा दंड आहे. प्रत्येक दिवशी वेगमर्यादेसंदर्भातची कारवाई ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

काही राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वेगमर्यादा दर्शक फलक लावण्यासाठीचा प्रस्ताव संबंधित पालिका व पंचायतींना पाठवूनही त्याची कार्यवाही केलेली नाही. मांडवी पुलावर वेगमर्यादा ३० किलोमीटर तर अटल सेतूवर व झुआरी पुलावर ही वेगमर्यादा ५० किलोमीटर आहे.

‘स्पीड गन रडार’ तैनात!

‘स्पीड गन रडार’ तैनात करून कारवाईस पोलिस उभे राहिल्यास त्याची कल्पना वाहन चालक एकमेकाला देतात, त्यामुळे हे वाहन चालक सतर्क होतात. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास ऑटोमेटिक (स्वयंचलित) वाहनांची नोंद करणारी यंत्रे राज्यभर बसवल्यास वाहन चालकांवर बरेच नियंत्रण येईल. ताळगावातील गोवा विद्यापीठ रस्त्यावर तसेच सेंट मायकल हायस्कूल ते आदर्श कॉलनीपर्यंत अशी स्वयंचलित यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे गोवा विद्यापीठ येथील अपघातांवर बरेच नियंत्रण आले आहे, असे मत वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT