Daksh Polji HSSC Success Dainiak Gomantak
गोवा

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Daksh Polji HSSC Success: प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत दिव्यांग दक्ष पोळजी याने बारावीच्या वाणिज्य शाखेत ८६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे: प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत दिव्यांग दक्ष पोळजी याने बारावीच्या वाणिज्य शाखेत ८६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आपल्या जिद्दी व चिकाटीच्या जोरावर त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. आता दक्षचे स्वप्न चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचे आहे; मात्र त्यासाठी त्याला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे यावे, असे आवाहन ॲड. कुणाल ठाकूर आणि पत्रकार महादेव गवंडी यांनी केले आहे.

दक्षने पुढील शिक्षणासाठी संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयात प्रवेश घेतला असून वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केल्यानंतर सीए होण्याचा त्याचा निर्धार आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्याच्या शिक्षणास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी त्याला विशेष वाहनाचीही आवश्यकता आहे.

दरम्यान, ‘स्ट्रीट प्रोव्हायडर’ या स्वयंसेवी संस्थेशी ॲड. कुणाल ठाकूर यांनी संपर्क साधून दक्षची परिस्थिती मांडली. संस्थेने तात्काळ प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळी दक्षच्या घरी भेट देऊन त्याला आर्थिक मदत दिली. संस्थेचे व्यवस्थापक स्वप्नेश साळगावकर यांनी त्यांच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षण व प्रवासासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तसेच बारावी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल दक्षचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. कुणाल ठाकूर, फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, दक्षचे वडील राजन पोळजी तसेच काका अशोक पोळजी उपस्थित होते.

आर्थिक स्थिती हलाखीची

दहावी व बारावीचे शिक्षण त्याने मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असली तरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दोन वर्षांपूर्वी वडिलांना आजारामुळे पाय गमवावा लागला असून त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे. आई गृहिणी आहे. घरात स्थिर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT