Special Train to Velankanni from Goa Dainik Gomantak
गोवा

वालांकिणीला जाण्यासाठी गोव्यातून 7 मार्चपासून विशेष ट्रेन

कोव्हिड महामारीच्या काळात प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आलेली वालांकिणी एक्स्प्रेस पूर्ववत

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातून वालांकिणीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. तमिळनाडू येथे असलेल्या अवर लेडी ऑफ वालांकिणी सायबीणीच्या भेटीसाठी गोव्यातील भक्तांना दक्षिण - पश्चिम रेल्वे तर्फे रेल्वे प्रवासाची सोय करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोव्हिड महामारीच्या काळात ही रेल्वे प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ती आता पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. (Special Train to Velankanni from Goa News Updates)

या विशेष ट्रेनची (Train) सुरुवात सोमवार 7 मार्चपासून होणार असून ट्रेन क्रमांक 17315 वास्को रेल्वे स्टेशन वरुन सकाळी 9 वाजता सुटणार आहे. आणि यानंतर मडगाव, (Madgaon) लोंढा, हुबळी, बन्सवाडी, कारुर, तिरुवरूर, नागपटनम यासह 24 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता वालांकिणी या ठिकाणी पोचणार आहे.

ट्रेन क्रमांक 17316 ही वालांकिणी रेल्वे (Railway) स्थानकावरुन दर गुरुवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटाला सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 3.25 वाजता वास्को येथील रेल्वे स्थानकावर या ट्रेनचे आगमन होणार आहे. याची सुरुवात 8 मार्च पासून होणार आहे. या ट्रेनला 2 टीयर एसीचा 1 डबा, 3 टीयर एसीचे 4 डबे, स्लिपरचे 7 डबे यासोबत इतर मिळून एकंदरीत 18 डबे जोडण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT