Know Your Neighbour  Dainik Gomantak
गोवा

Know Your Neighbour : तुमच्या शेजारी कोण राहतात? पोलिसांच्या तपासात सापडलेत नोंदणी नसलेले भाडेकरू

भाडेकरूंची धरपकड सुरुच; 25 जणांवर केली कारवाई

दैनिक गोमंतक

गेले काही दिवस गोव्यात अवैध प्रकार वाढल्याने गोवा पोलिसांकडे नोंदणी न केलेल्या भाडेकरु नागरीकांची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभुमीवर आज काकोडा, कुडचडे येथे पोलिसांनी 25 जणांवर कारवाई केली. गुन्ह्यांत अडकलेले गुन्हेगार, दहशतवादी, ड्रग्ज माफिया, बांगलादेशी घुसखोर यांच्यावरील कारवाईला वेग येण्यासाठी पडताणी आवश्यक असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

( Special Tenant verification drive at Kokoda Curchorem that 25 tenants out of 150 have not filled the tenant forms )

मिळालेल्या माहितीनुसार आज दक्षिण जिल्ह्यात पोलिसांनी काकोडा, कुडचडे येथे भेट देत स्थानिकांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी भाडेकरू पडताळणी फॉर्म न भरता भाडेकरूंना जागा भाड्याने देणाऱ्या मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करत चौकशी केली.

पोलिसांनी आज तब्बल 150 भाडेकरूंच्या पताळणीमध्ये 25 भाडेकरूंनी भाडेकरू फॉर्म भरलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मोहिम #Know Your Neighbours या उपक्रमांतर्गत राबवली जात आहे.

...म्हणून भाडेकरूंचा पडताळणी अर्ज भरणे आवश्यक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यांत अडकलेले गुन्हेगार, दहशतवादी, ड्रग्ज माफिया, बांगलादेशी घुसखोर गोव्यात बिनधास्तपणे भाड्याच्या खोलीत राहतात आणि भुरट्या चोरट्यांपासून विविध गुन्हे करून पसार होतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस स्थानकात भाडेकरूंचा पडताळणी अर्ज भरणे सरकारने बंधनकारक केले असल्याचं म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT