Carnival Festival Dainik Gomantak
गोवा

कार्निव्हल फेस्टिव्हलमध्ये खाद्य उद्योजकांसाठी विशेष संधी!

यंदाच्या कार्निव्हल फेस्टिव्हलमध्ये (Carnival Festival) या खाद्य उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या निर्मितीचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Carnival Festival: मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे नोकरी-व्यवसाय उद्ध्वस्त झाले. सामान्यांना याचा जबर फटका बसला होता. नोकरी गेलेल्या अनेकांनी या काळात छोटेखानी व्यवसाय सुरू केले; ज्यामध्ये खाद्य उद्योजकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासंबंधीची महत्वाची बाब म्हणजे, यंदाच्या कार्निव्हल फेस्टिव्हलमध्ये (Carnival Festival) या खाद्य उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या निर्मितीचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावर्षी कार्निव्हल 26 फेब्रुवारीला पणजी, 27 फेब्रुवारी रोजी मडगाव, 28 फेब्रुवारी रोजी वास्को आणि 1 मार्चला म्हापसा येथे होणार आहे. कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ पणजी (CCP) ने फिअर्स किचन्स (FIERCE Kitchens) सोबत भागीदारी केली आहे. भारतातील पहिले पाककला इनक्यूबेटर 'द बीच कार्निव्हल' हे गोव्यातील स्थानिक उद्योजकांसाठी, 'फूडप्रेन्युअर्स'साठी मिरामार जवळ नव्याने नूतनीकरण केलेल्या पदपथावर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम स्थानिक उद्योजकांसाठी एक पर्वणी ठरणार असून ते या ठिकाणी आपली पाककृती सादर करू शकतील, असे पणजी शहराचे आयुक्त अग्नेलो फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. (Special Opportunity for Food Entrepreneurs at Carnival Festival)

गोव्यातून उदयास येणारे खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकासंबंधी नवकल्पना निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून पुढे जात असताना, फिअर्स किचन्सला CCP सोबत भागीदारी करण्यात आनंद होत आहे. स्वयंपाकासंबंधी इनक्यूबेटर हे आचारी उद्योजक आणि घरगुती स्वयंपाकी यांना राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठ आणि नेटवर्कमध्ये प्रवेश देऊन स्थानिक खाद्य उद्योजकांसह सर्वच घटकांवर याचा प्रभाव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे मत फिअर्स किचन्सचे संस्थापक फोंडेकर यांनी व्यक्त केले.

मिरामार बीचवरील (Miramar Beach) 'बीच कार्निव्हल फूडप्रेन्युअर आणि इच्छुक खाद्य उद्योजकांना त्यांच्या कल्पना, उत्पादने आणि प्रतिभेचे प्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणार आहे. या कार्यक्रमात गोव्याची संस्कृती, वारसा आणि स्वागतार्ह भावनेचेही चित्रण केले जाईल. या कार्यक्रमात घरगुती स्वयंपाकी, महिला लघू उद्योजक, पेस्ट्री आणि बेकरी आणि इतर पाककला खाद्य व्यावसायिक सहभागी होतील. कार्निव्हलच्या प्रेक्षकांना स्थानिक आणि प्रादेशिक कुकिंग टॅलेंट या दरम्यान पाहायला मिळणार आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT