Cape Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Cape News : दिव्यांगांसाठी खास हॉस्टेल उभारणार : मुख्यमंत्री सावंत

Cape News : कुडचडे येथे संजय स्कूल इमारतीची पायाभरणी

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News : केपे, राज्य सरकारने दिव्यांग मुलांच्या सांगोपनासाठी खास हॉस्टेल उभारण्याचा संकल्प केला असून कोणत्याही सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन पूर्ण या हॉस्टेलची जबाबदारी घेतल्यास सरकार अनुदान देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कुडचडे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संजय स्कूलच्या नवीन इमारतीची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नगराध्यक्ष प्रदीप नाईक, सरपंच कविता गावस देसाई, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, संजय स्कूलचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळयेकर, शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कुडचडे मतदारसंघात राज्यात अद्याप दिव्यांग मुलांसाठी कुठेही उभारली गेली नाही, अशी सुसज्ज अशी वास्तू उभारण्यात येणार असल्याने आपल्याला आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी अनेक शिक्षण संस्था मोठ मोठ्या इमारती उभारतात पण दिव्यांगासाठी सुसज्ज अशी शाळा नसल्याने त्यांच्या पालकांचीही चिंता वाढली होती. पण ही उणीव आमच्या सरकारने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना बाजारात जाऊन खरेदी कशी करतात हे प्रशिक्षण देण्यासाठी या शाळेत व्यवस्था केली आहे. तसेच इतर व्होकेशनल कोर्सही येथे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्यांग मुलांसाठी अनेक योजना राबवत असून त्याचे जास्त लक्ष या मुलांवर आहे, असे त्यांनी सांगितले.

कुडचडेत बरीच कामे रखडली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ती येत्या तीन वर्षात पूर्ण करून द्यावीत, अशी मागणी काब्राल यांनी यावेळी केली. संजय स्कूलची इमारत तयार व्हावी म्हणून आम्ही बरेच प्रयत्न केले.

कारण गेल्या काही वर्षात बऱ्याच ठिकाणी या शाळेचे स्थलांतर करावे लागल्याने पालकांना व मुलांनाही त्रास होत होता. पण आता सुमारे पंधरा कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या शाळेमुळे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले. सदर शाळेत २८ क्लास रूम असून साधारण ४०० विद्यार्थी क्षमता असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT