Special Emergency Room at Goa Medical College Hospital for 37th National Games:  Dainik Gomantak
गोवा

37th National Games साठी गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात 'स्पेशल इमर्जन्सी रूम'

डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज

Akshay Nirmale

Special Emergency Room at Goa Medical College Hospital for 37th National Games: गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला सुरवात झाली आहे. खेळाडु, प्रशिक्षक यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा केल्या जात आहेत.

त्याच तयारीचा भाग म्हणून बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज (गोमॅको) रूग्णालयात एक 'विशेष आपत्कालीन कक्ष' (Special Emergency Room) सज्ज करण्यात आली आहे.

या स्पेशल इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना, ज्यांना उपचाराची गरज भासू शकेल त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. सर्व स्पेशॅलिटी तसेच सुपर स्पेशालिटीजचे प्रमुख कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संपर्कात असतील.

जखमी खेळाडूंवर येथे तातडीने उपचाय केले जातील. त्यात कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगितले जात आहे. जेव्हा रूग्णवाहिकेतून जखमी खेळाडूंना येथे आणण्यात येत असेल तेव्हाच डीन आणि इतर डॉक्टरांना सूचित केले जाईल.

जखमी खेळाडूंना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवली जाईल आणि आपत्कालीन शस्त्रक्रियांसाठी प्राधान्य दिले जाईल.

सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये आयसीयूमध्ये खेळाडूंसाठी एक क्युबिकल राखीव ठेवण्यात आले आहे आणि प्रत्येकी दोन बेड असलेल्या पाच खाजगी वॉर्ड रूम देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, हा आपत्कालीन कक्ष उभारताना GMC मधील डॉक्टरांनी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांदरम्यान खेळाडूंना काय दुखापती झाल्या होत्या, याचाही अभ्यास केला आहे. त्यामुळे काय सज्जता असावी, याची तयारी केली गेली आहे.

ऑर्थोपेडिक आणि डोक्याला दुखापती होण्याची शक्यता ओळखून डॉक्टरांची टीम सज्ज झाली आहे. चांगला खेळ करत असताना दुखापती होऊ शकतात. कधीकधी या दुखापती गंभीरही असू शकतात. पण आम्ही तयार आहोत, असे येथील डॉक्टर म्हणताहेत.

डिहायड्रेशन आणि स्नायूंन दुखापती यावर वैद्यकीय कक्षांमध्ये उपचार केले जाऊ शकतात. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालये, फोंडा आणि चिखली उपजिल्हा रुग्णालये आणि जीएमसी अशा पाच रुग्णालयांमध्ये दुखापतींच्या तीव्रतेनुसार खेळाडूंना हलवता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT