Goa Special Child School Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'स्पेशल चाइल्ड' शाळाही विद्यार्थ्यांच्या येण्याने गजबजल्या!

विद्यार्थ्यांनमुळे शिक्षक झाले भावनिक

दैनिक गोमन्तक

Goa Special Child School: आजपासून गोव्यातील पहिली ते बारावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत. पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी सरकारच्या निर्णयाला पालकांनी सहमती दर्शवून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले आहे. तब्बल 2 वर्षांनंतर शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत.

याचबरोबर गोव्यातील बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळादेखील आज दोन वर्षांनंतर भरल्या आहेत. यासंदर्भात संजय स्कूलचे चेअरमन गुरुप्रसाद पावसकर यांनी खाजगी मीडियाशी संपर्क साधला असता, त्यांनी अत्यंत भावनिक मत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, पर्वरी संजय स्कूलच्या 'स्पेशल चाईल्ड' शाळेत जवळपास 500 विद्यार्थी आहेत. याशिवाय संपूर्ण गोव्यामध्ये इतर शाखांमध्ये मिळून 1000 च्या आसपास विद्यार्थी शिकत आहेत. पण मागील दोन वर्षांपासून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना भेटू शकलो नव्हतो. यादरम्यान शाळेतर्फे ऑनलाईन वर्ग (Online Class) आयोजित केले होते. पण बऱ्याच ठिकाणी नेटवर्कच्या तक्रारीमुळे ऑनलाईन वर्ग घेणे शक्य होत नव्हते. पण आज दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येताना बघून आम्ही खूप भारावून गेलो आहोत.

बौद्धिक कार्यक्षमता कमी असलेल्या मुलांना मुळातच जास्त आधाराची आणि शिकवणीची गरज असते.अशा वेळी दूर राहून ऑनलाईन शिक्षणातून या विद्यार्थ्यांना आम्हाला म्हणावे इतके लक्ष देता येणे कठीण होते. पालकांनाही या सर्व गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरत होत होती. त्यामुळे आम्हीही अत्यंत विचारात पडलो होतो.आता शाळा सुरू झाल्यामुळे आम्ही या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ देऊ शकू आणि त्यांना लागणारे शिक्षण आणि सहाय्यता देण्यास आता आम्ही सक्षम आहोत.

शाळेत आज या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेने सर्व वर्गांमध्ये सजावट केली होती. अत्यंत भावनिक रीतीने शाळेने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT