रमेश तवडकर Dainik Gomantak
गोवा

सभापती रमेश तवडकर यांचा आगोंद येथे सत्कार

श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

आगोंद: देश सर्वोपरी असून या देशाला परम वैभवावर नेण्याकरता भाजप कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. ध्येयापासून कधीही विचलित होऊ नका. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊनच आपण हे कार्य करू शकतो. विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन कार्य केल्यामुळेच अपेक्षित यश प्राप्त झाले, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

आगोंद पंचायत क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांतर्फे तवडकर यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल 6 रोजी ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त अधिकारी सदानंद ऊर्फ विनोद देसाई यांच्या हस्ते, पुष्पहार शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सभापती तवडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह सदानंद ऊर्फ विनोद देसाई, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, उपाध्यक्ष शाबा ना. गावकर, लक्ष्या उर्फ अण्णा शेट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन देसाई यांनी केले, आणि शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी गौरव भगत, नारायण देसाई, किरण नाईक गावकर, ॲन्थनी बोर्जीस, संजू नाईक देसाई, काशिनाथ फळदेसाई, मोतीलाल पागी, धनंजय पागी, महेश नाईक गावकर, नेताजी गावकर, उल्हास पागी, राजेश पागी व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

SCROLL FOR NEXT