Vasco To Kulem Trains Cancel Dainik Gomantak
गोवा

Vasco Train Cancel: वास्को ते कुळे दरम्यानच्या ट्रेन तब्बल 12 दिवसांसाठी रद्द

ट्रेन 19 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत 12 दिवसांसाठी रद्द

दैनिक गोमन्तक

Vasco To Kulem Trains Cancel: दक्षिण पश्चिम रेल्वेने वास्को ते कुळे दरम्यानच्या ट्रेन तब्बल 12 दिवसांसाठी रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

ट्रेन क्रमांक 0 7380 / 07379 वास्को-कुळे-वास्को स्पेशल 19 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत 12 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे मिळालेल्या माहितीनुसार, माजोर्डा आणि वास्को स्थानकांदरम्यान चालू असलेल्या विद्युत देखभालीच्या कामामुळे या गाड्या 12 दिवसांच्या कालावधीसाठी रद्द केल्या आहेत.

गणेश चतुर्थीच्या तोंडावर तब्बल 12 दिवस ट्रेन रद्द झाल्याने, रेल्वे सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होऊ शकतो.

बरेच विद्यार्थी, ऑफिसला जाणारे आणि इतर प्रवासी ही रेल्वेसेवा वापरतात कारण ती अधिक सोयीस्कर आणि परवडणारी आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान नातेवाईकांना भेटण्यासाठी लोक रेल्वे सेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांना आता इतर वाहतूक मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT