Vinayakan Viral Video Goa Twitter
गोवा

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

Vinayakan Goa Fight Video: दक्षिणेतील एवढा मोठा नट स्थानिक दुकानदारासोबत हुज्जत घालताना दिसतोय.

Akshata Chhatre

गोवा: मॉलीवूड अभिनेता विनायकन हा अचानक गोव्यातील एका दुकानदारासोबत वाद घालताना दिसला. हा अभिनेता नेमका कोणत्या कारणावरून वाद घालत होता हे जरी अस्पष्ट असलं तरी देखील तो व्हिडीओमध्ये मल्याळम भाषेत जोरजोरात ओरडताना दिसतोय.

Thellu Vadakkuदक्षिण चित्रपटांमध्ये विनायकन हे नाव त्याच्या अभिनयासाठी तसेच त्याच्या चित्रपटांव्यतिरिक वादांसाठी बरंच प्रचलित आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी जोरदार कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतायत.

व्हिडीओमध्ये विनायकनचं वागणं बघून अनेकांना हा त्याचा अभिनय आहे की तो खरोखरच चिडलाय असा प्रश्नच पडलाय. दक्षिणेतील एवढा मोठा नट केवळ बनियानवर हात मागे घेऊन स्थानिक दुकानदारासोबत हुज्जत घालताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओवर लोकं वेगेवेगळे कमेंट्स करतायत. काहींच्या मते तो ड्रग्सच्या नशेत बरळतोय, तर काहींच्या म्हणण्यानुसार त्याच्या मनावर परिणाम झालाय. एक नेटकरी तर थेट त्याला चित्रपटात प्रमुख भूमिका न मिळाल्याने तो बावचळल्याचं म्हणालाय.

विनायकन याचा लवकरच थेल्लू वडाक्कू नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात तो प्रसिद्ध दक्षिण अभिनेता ममोटी सोबत काम करताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT