MP Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha: लाभार्थ्यांसाठी वाट पाहत थांबणार नाही! लोकांनी वेळ पाळायला शिकले पाहिजे...

दिव्यांग व्यक्तीवरून झालेल्या वादावर खासदार सार्दिन यांचे स्पष्टीकरण

Akshay Nirmale

Francisco Sardinha: दिव्यांगांसाठी तीन चाकी गाडी प्रदान करण्याच्या कार्यक्रमात एक दिव्यांग लाभार्थी उशिरा आल्यावरून दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन हे त्याच्यावर संतापले होते. तसेच त्याला गाडी न देताच निघून गेले होते. त्यावरून खासदार सार्दिन यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यावर आता सार्दिन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

खासदार सार्दिन म्हणाले की, लाभार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजता यायला सांगितले होते. कारण सकाळी ११ ला माझी एक महत्वाची बैठक होती. तुम्ही जर लाभार्थी असुनही उशिरा कसे काय येऊ शकता? मी त्यांना बाईक देण्यास विरोध केलेला नाही किंवा टाळलेले नाही.

तर केवळ त्यांना रविवारच्या कार्यक्रमात येऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले आहे. लोकांनी वेळेवर यायला शिकले पाहिजे. लोकांनी वेळ पाळली पाहिजे. जर त्यांना विलंब होणार होता तर तसे त्यांनी आधीच कळवायचे होते. लाभार्थ्यांसाठी आम्ही वाट पाहत थांबणार नाही.

नेमके काय घडले होते?

दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या खासदार निधीतून चार गाड्या दिव्यांगांना देण्यात आल्या. यावेळी दहा मिनिटे उशिरा आलेल्या एका दिव्यांग लाभार्थ्यावर खासदार सार्दिन संतापले, शिवाय त्याला गाडी न देताच माघारी देखील धाडले गेले होते.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला होता. सर्व लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी पावणे अकरा वाजता बोलवले होते.

एक लाभार्थी नियोजित वेळेत न आल्याने खासदार सार्दिन यांचा पारा चढला आणि त्याला गाडी देण्यास त्यांनी नकार दिला. तुम्हाला वेळेत यायला काय होते? आता रविवारच्या कार्यक्रमात येऊन गाडी घ्या, असे सार्दिन यांनी त्याला सांगितले.

संबंधित दिव्यांग व्यक्ती शेवटपर्यंत गाडी मिळेल या आशेने थांबला होता. पण, त्याला रिकाम्या हातीच परतावे लागले. या प्रकरणावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Live News: डिचोलीत स्मारकांची स्वच्छता; आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घेतला हातात झाडू

US China Trade: डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग यांच्यात होणार मिटिंग? आयातशुल्क निर्णय 90 दिवस लांबणीवर; वाद टळला

SCROLL FOR NEXT