Francis Sardin  Dainik Gomantak
गोवा

South Goa : मुख्यमंत्र्यांनी तोंड बंद ठेवावे व डोळे उघडावे : सार्दिन

South Goa : दक्षिण गोव्यात केलेल्या विकासकामांचा वाचला पाढा

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

सासष्टी, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी दक्षिण गोव्यात जी लोकांच्या उपयोगाची कामे केली आहेत त्याचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला.

त्यानी सांगितले की, पाच वर्षांत आपल्याला खासदार निधितून जे अनुदान मंजूर झाले होते ते पूर्णपणे आपण लोकांसाठी खर्च केले आहे. शिवाय माजी खासदाराचे २.६० कोटी रुपये बाकी होते त्याचा सुद्धा लोकोपयोगी विकासासाठी खर्च केला. खासदार या नात्याने मी काहीच केले नाही असा जो टोमणा मारला जातो, त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही आहेत. त्यांनी आपले तोंड बंद ठेवावे व डोळे उघडून आपण जी लोकोपयोगी कामे केली आहेत ती पाहावीत असा सल्ला खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी आज दिला.

सार्दिन म्हणाले की आपण ग्रामीण भागात रस्ता रुंदीकरणासाठी स्लॅब दिले. शिवाय रस्त्यावर हायमास्ट वीज दिवे दिले. ३ रुग्णवाहिका, ३ मैदाने, कित्येक गावांमघ्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, ३ जिम्नेजियम दिले, ४५ शाळांमध्ये संगणक व प्रयोग शाळांसाठी उपकरणे दिली. शिवाय ५३ अपंगांना तीन चाकी स्कूटर्स दिल्या, शिवाय संसदेत २७७ प्रश्र्न विचारले. त्यातील १४ तारांकित व ८७ अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे.

जे प्रश्र्न, समस्या मी संसदेत मांडू शकलो नाही त्या लिहून संबंधित मंत्र्यांना दिल्या. असे असून सुद्धा आपण काहीच केले नाही असे म्हणणे चुकीचे व लोकांची दिशाभूल करणारे नाही का, असा प्रश्र्न ही सार्दिन यांनी उपस्थित केला.

सार्दिन म्हणाले की, सरकार गोव्यामध्ये काय करतो ते आम्ही पाहतोच आहे. खात्या खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत व लोकांना त्याचा त्रास होत असतो याकडे सरकारने प्रथम लक्ष द्यावे असा सल्लाही सार्दिन यांनी दिला.

दाबोळी विमानतळासाठी ६०० कोटी

शिवाय दाबोळी विमानतळ कायमस्वरूपी राहणार आहे असे प्रतिपादनही केले. दाबोळी विमानतळाची दुरुस्ती, नूतनीकरणासाठी आपण ६०० कोटी रुपये मंजूर करून आणले होते. हल्लीच आणखी २६० कोटी रुपये मंजूर झाल्याचेही सार्दिन यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की आपण लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवारी देणे किंवा नाही ते पक्ष ठरवेल. त्याच प्रमाणे सीएए कायद्यासंदर्भात आपल्याला काहीच बोलायचे नाही. कॉंग्रेस पक्ष या संदर्भात काय ती भूमिका स्पष्ट करेल असेही त्यांनी सांगितले.

फातोर्ड्यात काहीच कामे केलेली नाहीत, या बद्दल बोलताना सार्दिन यांनी सांगितले की, फातोर्ड्यातील जे जे लोक आपल्याकडे समस्या घेऊन आले, त्या सोडविण्याचा आपण प्रयत्न केला. काहीजण आपल्याला विरोध करतात किंवा आपल्या विरोधात काम करण्याची धमकी देतात त्यांचे काय करायचे ते पक्ष ठरवेल असेही सार्दिन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT