Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'सुनीता सावंतना अती भगवेपणाचं फळ मिळालं...' सरदेसाईंचं शरसंधान; बदली प्रकरणावरुन गोव्यातलं राजकारण पेटलं

South Goa SP Sunita Sawant Transfer Controversy: बदली करण्यात आलेल्या दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत या स्वतःच अती भगव्या झाल्या होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: बदली करण्यात आलेल्या दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत या स्वतःच अती भगव्या झाल्या होत्या. कदाचित आता त्यांना त्याचेच फळ मिळाले असावे, अशी उपरोधिक टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

फातोर्डा येथे एका कार्यक्रमावेळी याबाबत विचारले असता सरदेसाई म्हणाले की, या पोलिस अधीक्षकांची मी दुसरी बाजूही पाहिली आहे. त्या निःपक्षपाती नव्हत्या. त्या मुख्यमंत्र्यांना खूप जवळ होत्या. त्‍यांच्‍यासमोर खूप चांगल्‍या वागायच्‍या. कदाचित त्यामुळेच त्यांना ही भेट असावी, असा टोला सरदेसाई यांनी हाणला.

आता कधीही, काहीही घडते

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या काळात अचानक होणाऱ्या बदल्या नवीन नाहीत आणि आश्‍चर्यकारकही नाहीत. मी मुख्‍यमंत्र्यांना पाठिंबा दिला होता आणि मलासुद्धा त्यांनी असेच एका रात्रीत मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. या सरकारच्‍या (Government) काळात कोणालाही एका रात्रीत कोणत्याही पदावरून काढून टाकता येते. त्यांच्या राज्यात उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर दिगंबर कामत यांना विचारा. मागची दोन वर्षे त्‍यांना मंत्रिपदापासून दूर ताटकळत ठेवले आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT