South Goa SP Abhishek Dhaniya Dainik Gomantak
गोवा

ATM Security Goa: ‘एटीएम’वर सीसीटीव्ही, रक्षक सक्तीचे : दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक

दैनिक गोमन्तक डिजिटल

South Goa SP Abhishek Dhaniya on ATM Security: राज्यात मागच्या वर्षी कित्येक एटीएम मशीन्स चोरण्याच्या घटना घडल्याने आता यापुढे एटीएम केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच सुरक्षा रक्षक ठेवणे बंधनकारक केले असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.

मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात रावणफोंड व फोंडा येथे एटीएम मशीन्स चोरण्याच्या घटना घडल्या होत्या. हे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून 1 एप्रिलपासून ज्या केंद्रावर अशी व्यवस्था नसेल त्या बँकांवर करवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण मागच्या वर्षांच्या तुलनेत बरेच नियंत्रणात आले आहे. मागच्या वर्षी पहिल्या दोन महिन्यांत 313 गुन्हेगारी प्रकरणे झाली होती.

यंदा पहिल्या दोन महिन्यांत हे प्रमाण 155 पर्यंत खाली आले आहे. हे प्रमाण आदल्या गुन्हेगारीच्या तुलनेने निम्मे असून यावेळी 80 टक्के गुन्हेगारीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती धानिया यांनी दिली.

भाडेकरूंच्या माहितीवर भर

धानिया यांनी सांगितले की, पोलिसांनी सध्या भाडेकरूंची माहिती घेण्याच्या प्रक्रियेत गती आणली आहे. मागच्या वर्षी पहिल्या दोन महिन्यांत पोलिसांनी 2,763 जणांची छाननी केली होती.

यावेळी पहिल्या दोन महिन्यांत या छाननीची संख्या 4,830 वर पोहोचली. ‘प्रयास’ आणि ‘तुमच्या शेजाऱ्यांना ओळखा’ या दोन माध्यमांतून पोलिस ही माहिती गोळा करत आहेत.

"दक्षिण गोव्यात भुरट्या चोऱ्या आणि वाटमाऱ्यांचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वाटमारींची 16 ठिकाणे पोलिसांच्या लक्षात आलेली असून तिथे नियंत्रण आणण्यासाठी गस्त वाढविली आहे."

"दक्षिण गोव्यातील सराईत गुन्हेगारांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. पोलिस रेकॉर्डप्रमाणे 101 सराईत गुन्हेगार असून त्यातील 91 गुन्हेगारांचे येथे अजून वास्तव्य आहे. दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण राज्याच्या बाहेर आहेत. चारजण सध्या तुरुंगाची हवा खात आहेत."

- अभिषेक धानिया, पोलिस अधीक्षक, दक्षिण गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT