ABVP on St. Xavier's College Mapusa: "छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचा प्राण आणि अभिमान आहेत. महाराजांची जयंती साजरी करण्यास सेंट झेवियर महाविद्यालयात परवानगी देण्यात आली नाही. या महाविद्यालयात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आहे की नाही?"
असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी यासंबधी दखल घ्यावी व राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असे आवाहन अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल (Yagywalkya Shukla) यांनी केले.
याज्ञवल्क्य शुक्ल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. गुरूवारी त्यांनी संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संघटनेच्या धनश्री मांद्रेकर, सुदीप नाईक, साहिल महाजन व वैभव साळगावकर उपस्थित होते.
सेंट झेवियर महाविद्यालयात शिवजयंती साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना का रोखण्यात आले असा प्रश्न परिषदेचे महामंत्री शुक्ल यांनी उपस्थित केला. तसेच, महाविद्यालयाच्या निवडणुका घेण्यासही 72 दिवस उशीर केला. विद्यार्थी प्रतिनिधीला महाविद्यालय परिसरात उतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही. असेही शुक्ल म्हणाले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP Goa) स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात अमृतमहोत्सव साजरा केला जात असून देशभरात जिल्हास्तरीय संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 414 संमेलने झाली असून 06 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अशी माहिती याज्ञवल्क्य शुक्ल यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.