Slum Dainik Gomantak
गोवा

Goa Slums: गोव्यात 14 झोपडपट्ट्यांत सुमारे 27 हजार लोक! 2011ची आकडेवारी; संख्‍या बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता

Goa Slum Population: दक्षिण गोव्‍यातील मुरगाव, फोंडा व मडगाव या तीन शहरी भागांत तब्‍बल २६,८५० लोक झोपडपट्टीत राहत असल्‍याचे उघड झाले आहे. प्रत्‍यक्षात ही संख्‍या त्‍याहीपेक्षा बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता आहे.

Sameer Panditrao

मडगाव: दक्षिण गोव्‍यातील मुरगाव, फोंडा व मडगाव या तीन शहरी भागांत तब्‍बल २६,८५० लोक झोपडपट्टीत राहत असल्‍याचे उघड झाले आहे. प्रत्‍यक्षात ही संख्‍या त्‍याहीपेक्षा बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता आहे. कारण, ही आकडेवारी २०११ च्‍या जनगणनेनुसार असून त्‍यानंतरच्‍या आणखी १४ वर्षांत ही संख्‍या बरीच वाढू शकते.

नुकत्‍याच संपलेल्‍या विधानसभा अधिवेशनात ही माहिती पुढे आली असून झोपडपट्टीत राहणारे सर्वांत अधिक ‍लोक मुरगाव शहरातील असून या शहरात राहणारा प्रत्‍येक चौथा माणूस झोपडपट्टीत राहणारा आहे. या शहरात एकूण दहा झोपडपट्ट्या असून त्‍यात बायणा, मांगूरहिल, खारीवाडा, जेटी, गांधीनगर, न्‍यूवाडे, शांतिनगर आणि नॉन मॉन या झोपडपट्ट्यांचा समावेश आहे.

या शहराची २०११ ची जनगणना पाहिल्‍यास मुरगावच्या या बंदर शहरात एकूण ९४,३९४ लोक वास्‍तव करत असून यातील २४,२२७ लोक झोपडपट्टीत रहातात. या शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या एकूण लोकांची आकडेवारी २५.७ टक्‍के एवढी प्रचंड आहे.

फोंड्यात शांतिनगर आणि पंडितवाडा या दोन ठिकाणी झोपडपट्ट्या असून फोंड्यातील एकूण लोकसंख्‍येपैकी ४.३ टक्‍के लोक झोपडपट्टीत राहणारे आहेत. २०११ च्‍या जनगणनेनुसार एकूण ९८२ लोक या दोन ठिकाणच्‍या झोपडपट्टीत रहातात. मडगावात मोतीडोंगर आणि आझादनगर या दोन झोपडपट्ट्या असून मडगावात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची संख्‍या १.९ टक्‍के एवढी आहे. २०११ च्‍या जनगणनेनुसार या शहरातील एकूण ८७,६५० रहिवाशांपैकी १,६४१ रहिवासी या दोन झोपडपट्ट्यांत रहातात.

तीनच ‘अधिकृत झोपडपट्टी’ : या तिन्‍ही शहरांची परिस्‍थिती पाहिल्‍यास एकूण १४ झोपडपट्ट्यात सुमारे २७ हजार लोक रहात असून या १४ पैकी बायणा, मांगूरहिल आणि नॉन मॉन या तीनच झोपडपट्ट्या ''अधिकृत झोपडपट्टी'' म्हणून नोंद झालेल्या आहेत. बाकीच्‍या ११ झोपडपट्ट्या तशा नोंद झालेल्‍या आहेत. मडगावची मोतीडोंगर झोपडपट्टी नोंदणीकृत करण्‍यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. ज्‍या झोपडपट्ट्या नोंद झालेल्‍या आहेत. तिथे किमान साधनसुविधा उभारण्‍याची प्रशासनाची जबाबदारी असते आणि कालांतराने या झोपडपट्ट्यांतील लोकांचे पुनर्वसन करणे अपेक्षित असते.

सार्वजनिक आरोग्याची हेळसांड

मुरगावातील न्‍यू वाडे येथील झोपडपट्टी सर्वांत मोठी असून येथे ४६०० लोक रहातात. येथे एकूण १,१०० घरे आहेत.

फोंड्यातील शांतिनगर आणि पंडितवाडा या झोपडपट्ट्यात सुमारे एक हजार लोक राहत असून या तिन्‍ही ठिकाणची राहणीमानाची स्‍थिती अगदी हलाखीची आहे.

न्‍यूवाडे झोपडपट्टीत सुमारे ११०० घरे असून त्‍यांच्‍यासाठी फक्‍त १८० शौचालये आहेत. फक्‍त तीन ठिकाणी सार्वजनिक पाण्‍याची व्‍यवस्‍था आहे.

फोंड्यातील शांतिनगर या झोपडपट्टीत ७८७ लोक राहत असून या सर्व लोकांसाठी फक्‍त २१ शौचालये आहेत. ही संख्‍या पाहिल्‍यास ३७ लोकांसाठी एक शौचालय अशी स्‍थिती आहे.

पंडितवाडा या झोपडपट्टीत एकूण ३० घरे असून तिथे १९५ लोक रहातात. त्‍यांच्‍यासाठी फक्‍त २३ शौचालये आहेत.

मडगावच्‍या मोतीडोंगर या झोपडपट्टीत एकूण ४०२ घरे असून तिथे ८६६ लोक रहातात. मात्र या ठिकाणी नेमकी किती शौचालये आहेत याची नोंद नाही.

या झोपडपट्टीत एकूण ११ ठिकाणी सार्वजनिक पाण्‍याची सोय आहे. मात्र या सर्व झोपडपट्ट्यांत असलेल्‍या बहुतेक घरांना खासगी नळाची आणि विजेची जोडणी असल्‍याचे विधानसभेतून पुढे आलेल्‍या माहितीत म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akash Deep: मोठी बातमी! आकाशदीप पहिल्या सामन्यास मुकणार; इशान किशन दुखापतीमुळे बाहेर

Goa Rain: गोमंतकीयांनो काळजी घ्या! मुसळधार पावसाची शक्यता; सावधगिरी बाळगण्याचे निर्देश

Opinion: गाढ वाचेने करू गाढवाचे गुणगान!

Students Stress: न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवापिढी मनाने कमकुवत झाली आहे का?

Goa–London Flight: गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार! गोमंतकीयांसाठी खुशखबर; Air Indiaची मिळणार सेवा

SCROLL FOR NEXT