Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa: दक्षिण गोव्यात समुद्रकिनारे ओसाड, टॅक्सीचालक हताश; अपेक्षित पर्यटकांअभावी मोठे नुकसान

द. गोव्यातील चित्र : लहान हॉटेलमालक, टॅक्सीचालक हताश

दैनिक गोमन्तक

नाताळचा सण व या वर्षाची सांगता अगदी जवळ येऊन ठेपलेली असतानाही दक्षिण गोव्यात खासकरून केळशी ते बोगमोळा समुद्रकिनारे काही प्रमाणात ओसाड पडलेले आहेत. अपेक्षित पर्यटक या भागांना भेट देत नसल्याचे जाणवू लागले आहे. त्यामुळे लहान हॉटेलमालक, वॉटर स्‍पोर्टस्‌वाले, टॅक्सीवाल्यांचा धंदा होत नसल्याने नुकसानीत दिवस कंठावे लागत आहेत.

लहान हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष सेराफिन कोता, वॉटर स्पोर्टस्‌चे मालक पेले फर्नांडिस व टॅक्सीचालक आलेक्स डिसोझा यांच्या म्हणण्यानुसार, सरकारतर्फे जे कार्यक्रम आयोजिले जातात ते सर्व उत्तर गोव्यातच आयोजित केले जातात. इफ्फी, लोकोत्सव, संगीताचे कार्यक्रम केवळ उत्तरेतच होतात. त्यामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटनस्थळांना प्रसिद्धी दिली जात नाही.

कोता म्हणाले, दाबोळी विमानतळ गेल्यातच जमा आहे. आता मोपा विमानतळाचा लाभ महाराष्ट्र सीमेवरील जी गावे आहेत, तिथे जे समुद्रकिनारे आहेत तिथे पर्यटक आकर्षित होतील. जोपर्यंत पर्यटनामध्ये ब्रॅंड गोवा उमटणार नाही तोपर्यंत गोवा पर्यटन क्षेत्रात मागे पडत राहणार आहे. त्याच प्रमाणे गोव्यात कशा प्रकारचा पर्यटक पाहिजे हे सरकारने ठरविले पाहिजे.

दक्षिण गोव्यात 35 टक्केही हॉटेलांचे आरक्षण झालेले नाही. टॅक्सीवाल्यांना भाडे मिळत नाही. दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात किंवा इतर पर्यटन ठिकाणी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला सरकारने प्रसिद्धी द्यायला हवी. दक्षिण गोव्यात कौटुंबिक पर्यटनाला वाव आहे. अशा परिस्थितीतही मी आशावादी आहे. - सेराफिन कोता, अध्यक्ष, हॉटेलमालक संघटना

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दक्षिण गोव्यात पर्यटन संबंधित कार्यक्रम आयोजनांवर भर द्यायला हवा. समुद्र किनाऱ्यांचा विकास केला पाहिजे. शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोल्या, किनाऱ्यांवरील स्वच्छता आदी मुलभूत गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. चांगल्या विकासकामांनाही काही लोक विरोध करतात तो त्यांनी करु नये.- पेले फर्नांडिस,मालक, वॉटर स्पोर्टस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मंत्री, आमदारांच्‍या गोटात खळबळ

Goa ZP Election Result 2025 Live Update: सत्तरीतून पहिला कल हाती; होंडा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर

Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

Goa ZP Election: भाजप–मगो युती 35 पेक्षा अधिक जागा जिंकेल! दामू नाईकांना ठाम विश्‍‍वास; सरकारमुळे मतदान वाढल्याचा केला दावा

Bardez: बार्देशात नेत्यांसमोर वर्चस्वाचे आव्हान, सस्पेन्स वाढला; ‘सायलंट’ मतदानामुळे अंदाज बांधणे कठीण

SCROLL FOR NEXT