South Goa Swiggy Riders Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात Swiggyचे डिलिव्हरी बॉय आक्रमक; कंपनीला राज्यातून हद्दपार करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa Swiggy Delivery Boys Protest

मडगाव: स्विगी फूड डिलिव्हरी ॲपमार्फत खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयज्नी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मेहनत करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला असून कंपनीच्या नव्या धोरणाविरुद्ध त्यांनी निषेध नोंदवण्यास सुरवात केली आहे.

कंपनीच्या नवीन धोरणानुसार स्विगी डिलिव्हरी बॉयज्ना मिळणारा इन्सेंटिव्ह (मोबदला) कमी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील सुमारे १०० रायडर्सनी काम बंद ठेवत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत काम न करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

दक्षिण गोव्यातील स्विगी या कंपनीच्या रायडर्सनी काम बंद करत आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. दक्षिण गोव्यातील सुमारे १०० रायडर्स मडगावातील कार्यालयाजवळ जमा झाले. यावेळी रायडर्सना मिळत असलेल्या इन्सेंटिव्ह कोणतीही पूर्वसूचना न देता कमी करण्यात आल्याने संताप व्यक्त केला.

रायडर शाहरुख यांनी सांगितले की, स्विगी कंपनीने रायडर्सचा वापर करून घेतला. आता त्यांना मिळणारा इन्सेंटिव्ह कमी करण्यात आलेला आहे. फूड डिलिव्हरी करणारे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करतात व यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवरच आपला उदरनिर्वाह चालवतात.

विश्वासात न घेता निर्णयाची अंमलबजावणी

याआधी दिलेले टार्गेट पूर्ण केले की त्याचा वेगळा मोबदला मिळायचा. दिवसभरात १२ ऑर्डर्स पूर्ण केल्यास ५६० रुपये तर १७ ऑर्डर्स पूर्ण केल्यास ९६० रुपये इन्सेंटिव्ह दिला जायचा.

आता कंपनीकडून पाच किलोमीटरपर्यंत केवळ २० रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आलेले असून कुणालाही विश्वासात न घेता या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे.

दिवसभराचा वैयक्तिक खर्च, पेट्रोल, गाडीची देखभाल, असा सर्व खर्च रायडर्स करत असून इन्सेंटिव्हमधील बदल मारक ठरणार आहे, असेही शाहरुख यांनी सांगितले.

सरकारनेही लक्ष घालावे!

स्विगीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष देत पूर्वीचेच इन्सेंटिव्ह पुन्हा लागू करावेत. सरकारनेही कामगारांची समस्या सोडवावी. अन्यथा कंपनीला राज्यातूनच हद्दपार करावे. जुन्या डिलिव्हरी बॉयज्ना कामावरून काढून टाकल्यास नव्या कर्मचाऱ्यांवर देखील हीच वेळ ओढावेल, असेही येथे उपस्थित अन्य एका डिलिव्हरी बॉयने म्हटले आहे. जोपर्यंत कामाचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असेही डिलिव्हरी बॉयज्नी यावेळी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT