South Goa District Hospital Dainik Gomantak
गोवा

Margao Hospital: हॉस्‍पिसियाेतील विदारक स्‍थिती! १७,४२५ रुग्‍णांना उपचारासाठी पाठवले बाहेर

South Goa District Hospital: यंदाच्‍या जानेवारी ते जून या सहा महिन्‍यांतच एकूण २०२४ रुग्‍णांना दुसऱ्या इस्‍पितळात ‘रेफर’ करण्‍यात आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ‘रेफरल हॉस्पिटल’ म्‍हणून शिक्‍का बसलेल्‍या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातून मागच्‍या चार वर्षांत तब्‍बल १७,४२५ रुग्‍णांना या इस्‍पितळात उपचार करता येत नसल्‍याच्‍या कारणांमुळे दुसऱ्या इस्‍पितळात पाठविण्‍यात आल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे.

यंदाच्‍या जानेवारी ते जून या सहा महिन्‍यांतच एकूण २०२४ रुग्‍णांना दुसऱ्या इस्‍पितळात ‘रेफर’ करण्‍यात आले आहे. यातून हॉस्‍पिसियाेतील विदारक स्‍थिती समोर येते, अशी प्रतिक्रिया हा मुद्दा उचलून धरलेले मडगावातील युवानेते प्रभव नायक यांनी व्‍यक्‍त केली. शुक्रवारी प्रभव नायक आणि इतरांनी एक निवेदन आरोग्‍यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्‍या कार्यालयात दिले होते.

मडगाव येथील रहिवासी श्रीधर ऊर्फ ​​शिरीष पै काणे यांच्या अपघाती मृत्यूच्या अत्यंत दुर्दैवी घटनेने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शनिवार, २४ ऑगस्ट रोजी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि सुसज्ज रुग्णवाहिका न मिळाल्याने आणखी एकाचा जीव गेला, असे युवा नेते प्रभव नायक यांनी पुढाकार घेऊन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना सादर केलेल्या निवेदनात मडगावच्या नागरिकांनी म्हटले आहे.

इस्पितळातील अतिदक्षता विभागात प्रगत उपकरणे बसवून तो पूर्णपणे कार्यरत करण्याची तातडीने गरज आहे. न्यूरो सर्जरी युनिट, कॅथ लॅब, ट्रॉमा युनिट आणि पुरेशा मनुष्यबळ संसाधनांसह इतर आरोग्य सेवा सुविधा स्थापन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या इस्‍पितळातील कर्मचाऱ्यांच्‍या कमी संख्‍येवरही चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली.

या निवेदनावर माजी आमदार उदय भेंब्रे, ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो, डॉ. व्ही.व्ही. कामत, माजी नगराध्यक्ष अजित हेगडे, राधाकांत पै काणे, महेंद्र आल्वारीस, दीप कारापूरकर, विनोद शिरोडकर आणि इतरांनी सह्या केल्या आहेत. नागरिकांकडून तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून सातत्याने मागणी करूनही सरकार हे इस्पितळ पूर्णपणे कार्यांवित करण्यात अपयशी ठरले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

रिक्त पदे त्वरित भरणे गरजेचे

‘हॉस्पिसियो’त १७३ रिक्त पदे आहेत व सध्या १९३ कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट किंवा अन्‍य प्रकारे तात्पुरत्या तत्त्वावर काम करत आहेत. गेल्या एका वर्षात रिक्त पदांची टक्केवारी २० वरून सुमारे २७ टक्के वाढली आहे. सरकारने सर्व रिक्त पदे त्वरित भरणे व नियमितपणे कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करणे सोपे होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षकांसह उपसंचालक, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ, वरिष्ठ शल्यचिकित्सक, मेडिको लीगल अधिकारी, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध कनिष्ठ पदे तसेच तंत्रज्ञ, एमटीएस यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामी रुग्णांना सेवा देण्यास विलंब होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

‘१०८’ कार्यप्रणाली जबाबदार

मडगावच्या नागरिकांनी किमान दोन कार्डियाक रुग्णवाहिका आणि पाच इतर श्रेणीतील रुग्णवाहिका पूर्णपणे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी देण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. १०८ रुग्णवाहिका सेवा या इस्पितळाच्या नियंत्रणाखाली नाही तसेच १०८ रुग्णवाहिका सेवेची कार्यप्रणाली हे पै काणे यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यास झालेल्या उशिराचे मुख्य कारण होते, असे निवेदनात म्हटले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी भेट द्यावी!

या निवेदनात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मडगावच्या नागरिकांसह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट द्यावी व समस्या जाणून घ्याव्यात तसेच या इस्पितळाच्या रिकाम्या जागेचा पूर्ण वापर करावा तसेच रुग्णांना गोमेकॉ व इतर खासगी इस्पितळांत का पाठविले जाते, याची सखोल चौकशी करावी, पै काणे यांना गोमेकॉत पाठविण्यास झालेल्या दिरंगाईची चौकशी करावी, अशा करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT