Margao Hospital: जिल्‍हा इस्‍पितळ की साधे आरोग्‍य केंद्र? संपूर्ण आरोग्‍य खातेच ‘डायट’वर

South Goa District Hospital: कॅज्‍युल्‍टीमध्‍ये मोठ्या प्रमाणावर रुग्‍ण येतात; एका डॉक्‍टरला दर दिवशी ३० ते ४० रुग्‍ण हाताळावे लागतात
South Goa District Hospital: कॅज्‍युल्‍टीमध्‍ये मोठ्या प्रमाणावर रुग्‍ण येतात; एका डॉक्‍टरला दर दिवशी ३० ते ४० रुग्‍ण हाताळावे लागतात
South Goa HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: परिपूर्ण ट्रोमा युनिट नाही आणि सुसज्‍ज असा न्‍यूरो सर्जरी विभागही चालत नाही. कार्डियोलॉजी विभागही नावापुरताच. सध्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ म्‍हणून बिरुदावली मिरवणाऱ्या हॉस्‍पिसियो समस्याग्रस्त बनले आहे. त्यामुळे काही विभागातील रुग्‍णांना गोमेकॉ इस्‍पितळात रवानगी करण्‍याशिवाय डॉक्‍टर्ससमोर दुसरा पर्याय उपलब्‍ध नाही. याचमुळे या हॉस्‍पिसियोला ‘रेफरल सेंटर’ असे नाव पडले आहे. हॉस्‍पिसियोची स्‍थिती रुळावर आणायची असेल तर मुख्‍यमंत्री आणि आरोग्‍यमंत्री यांनी योग्‍य तो समन्‍वय साधून काम करण्‍याची गरज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्‍यक्‍त केली.

‘गोमन्‍तक’ने हॉस्‍पिसियोची विदारक स्‍थिती या लेखमालेतून लोकांसमोर आणली आहे. त्‍याबद्दल बोलताना आलेमाव म्‍हणाले, सध्‍याची स्‍थिती पहाता, वित्तमंत्री असलेल्‍या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आरोग्‍य खात्‍यालाच ‘डायट’वर ठेवले आहे, की काय अशी शंका येते. त्‍यामुळे हॉस्‍पिसियोचीही उपासमार होत आहे.

आलेमाव म्‍हणाले, दुपारी १ नंतर या इस्‍पितळात पुरेसे डॉक्‍टरच नसल्‍याने हे जिल्‍हा इस्‍पितळ की साधे आरोग्‍य केंद्र? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडत आहे. या इस्‍पितळातील कित्‍येक जागा भरायच्‍या बाकी आहेत. दररोज कॅज्‍युल्‍टीमध्‍ये मोठ्या प्रमाणावर रुग्‍ण येतात. एका डॉक्‍टरला दर दिवशी ३० ते ४० रुग्‍ण हाताळावे लागतात. ओपीडीमध्‍ये होणारी गर्दी हाताळण्‍याएवढे कर्मचारी हॉस्‍पिसियोकडे उपलब्‍ध नाहीत. मी विधानसभा अधिवेशनात मुख्‍यमंत्री व आरोग्‍यमंत्र्यांना हॉस्‍पिसियोचे आरोग्‍य कसे सुधारणार हे पहावे? याबाबत विचारले होते.

आमदार विजय सरदेसाई यांनीही सरकारी कारभारावर टीका करताना, हॉस्‍पिसियोचे प्राधान्‍यक्रम काय हेच सरकारला माहीत नाही. हॉस्‍पिसियोचा कारभार सुधारण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयात रिट याचिका दाखल करावी लागली. न्‍यायालयाने सरकारचे कान पिळले. पण सरकार अजून काही करत नाही. एक इस्‍पितळ व्‍यवस्‍थित चालावे, यासाठी उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याची पाळी येते, यासारखे दुर्दैव नाही, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

खासगीकरणास विरोध

मध्‍यंतरी हॉस्‍पिसियो इस्‍पितळाचे वरचे दोन मजले खाली आहेत, तेथे खासगी वैद्यकीय इस्‍पितळ सुरू करून या संपूर्ण इस्‍पितळाचा ताबा या खासगी महाविद्यालयाकडे देण्‍याचे ठरले होते. मात्र या प्रस्‍तावाला विरोधकांनी विरोध केल्‍याने हा प्रस्‍ताव बाजूला ठेवला आहे. दक्षिण गोव्‍यातील लोकांना मोफत आणि चांगली व्‍यवस्‍था मिळावी, यासाठी काँग्रेस सरकारने हे इस्‍पितळ बांधले होते. त्‍याचे खासगीकरण करण्‍यास आम्‍ही कुठल्‍याही परिस्‍थितीत देणार नाही, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

South Goa District Hospital: कॅज्‍युल्‍टीमध्‍ये मोठ्या प्रमाणावर रुग्‍ण येतात; एका डॉक्‍टरला दर दिवशी ३० ते ४० रुग्‍ण हाताळावे लागतात
Margao Hospital: एक डॉक्‍टर आणि तीन परिचारिका हाताळतात वॉर्ड, मोजके प्रशिक्षित कामगार; व्यथा हाॅस्पिसियोची

परिस्‍थिती नियंत्रणाबाहेर!

पुरेशा निधीची तजवीज न केल्‍यामुळेच वैद्यकीय सामुग्री दुरुस्‍त होत नाही. एका डॉक्‍टरने यासाठी रुग्‍णवाहिकांचे उदाहरण दिले. या रुग्‍णवाहिकांच्‍या देखभालीसाठी दहा वर्षांपूर्वी निधी मंजूर केला होता, तो अजूनही तसाच आहे. या अपुऱ्या निधीत रुग्‍णवाहिकांची देखभाल ठेवणार तरी कशी? असे ते म्‍हणाले. या इस्‍पितळातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्‍पही देखभालीविना बंद असून या वाहिनीतून आता पाणी झिरपू लागल्‍यामुळे हॉस्‍पिसियोचा तळमजला पाण्‍याने भरून जातो. देखभालीसाठी पुरेसा निधी नसल्‍यामुळे इतर यंत्रसामग्रीही गंजून जात आहे. याकडे तातडीने लक्ष देण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

41 year old man found dead inside car in Calangute
Margao Market Encroachments
Goa Congress Kushavati district
Goa Dengue Screening For Migrant Workers
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com