Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मुलीवरील बलात्कारप्रकरणी बापाचा जामीन फेटाळला

उत्तर गोव्यात 2021 साली अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी बापाविरुद्धच पोलिस स्थानकात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime अल्पवयीन मुलीने तिच्यावरील बलात्कारप्रकरणातील संशयित बापाला जामीन देण्यास ना हरकत अर्ज न्यायालयात दाखल केला तरी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण करत विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.

या खटल्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू असून साक्षीदारांच्या जबान्या अजून नोंद व्हायच्या आहेत. संशयिताला जामीन मिळाल्यास तो धमकावण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मांडला तो न्यायालयाने उचलून धरत जामीन नाकारला आहे.

उत्तर गोव्यात 2021 साली अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी बापाविरुद्धच पोलिस स्थानकात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, बलात्कार, धमकी व पॉक्सो कायद्याखाली मुलीच्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

तेव्हापासून तो सध्या कोठडीत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून पीडित मुलगी व तिची आई, दोन स्वतंत्र पंच याच्यासह २९ जणांच्या साक्षीदारांसह न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.

आतापर्यंत मुलीची, तिच्या आईची व दोन पंचांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली आहे. या साक्षीत मुलीने व आईने घुमजांव करत त्यांनी खोटी तक्रार दिल्याची न्यायालयात साक्ष दिली आहे.

ही खोटी तक्रार आपल्या बहिणीने देण्यास भाग पाडले, असे मुलीच्या आईने सांगितले आहे. न्यायालयातही पीडित मुलीने जबानी देताना बापाला क्लीन चीट दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT