Margao Traffic: कारवाई फक्त दोन दिवस, पुन्हा परिस्थिती जैसे थे; मडगावात पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर

मठग्रामस्थ नाराज : अनेक जागांवर विक्रेत्यांचे बेकायदा अतिक्रमण
Margao Traffic
Margao TrafficDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Traffic मडगावच्या सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र, शहर कुरूप होत चालले आहे, असे मठग्रामस्थ आता बोलू लागले आहेत. मडगावमधील अनेक जागा विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्या आहेत व त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्याचप्रमाणे मडगावात पार्किंगचा प्रश्र्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. नागरिक आता उघडपणे या सर्वांवर आपली नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

‘गोमन्तक टिव्ही’चे प्रतिनिधी गौरांग प्रभू मळकर्णेकर यांच्याशी बोलताना पार्किंगच्या समस्येसाठी नागरिक पोलिसांच्या निष्क्रियतेला तसेच रखडलेल्या पार्किंग प्रकल्पाला व बेशिस्त पार्किंगला दोष देत आहेत.

आनंद सावंत या नागरिकाने सांगितले की, मडगावमध्ये सगळीकडेच वाहतूक कोंडीची समस्या आहे. कुणी आवाज उठवला तर पोलिस दोन दिवस कारवाई करतात मग गप्प बसतात.

Margao Traffic
Ghumat Aarti Competition: ‘गोमन्तक यीन’तर्फे ‘घुमट गंध’ स्पर्धेचे आयोजन

सिमरन प्रभू यांनी सांगितले की, मडगावमध्ये पार्किंगसाठी जागाच बाकी नाही. पार्किंग प्रकल्पाचे काय झाले, असा प्रश्र्न उपस्थित होतो. मडगाव नगरपालिका परिसरात सात शाळा आहेत. त्यामुळे सकाळी व दुपारी वाहतूक कोंडी होत असते.

त्याचा परिणाम मडगाव बाजारावरही पडतो. कुजिराप्रमाणे मडगावातही दवर्ली येथे शाळा स्थलांतरासाठी जागा घेतलेली आहे. मात्र, अजून त्यासंदर्भात गंभीरपणे निर्णय घेतलेले नाही.

Margao Traffic
MLA Divya Rane: पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचे डोंगुर्लीत उद्‍घाटन, गोव्यातील ठरलाय पहिलाच पाणलोट प्रकल्प

कारवाईविना शिस्त अशक्य : मडगाव हे मुख्य व्यापारी केंद्र असल्याने आजूबाजूच्या गावचे लोक मडगावमध्ये खरेदीसाठी येतात व त्यांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहने ठेवली जातात. पोलिस त्यांच्यावर काहीच कारवाई करीत नाहीत.

जोपर्यंत पोलिस दंडात्मक कारवाई करीत नाहीत, तोपर्यंत मडगाव शहरातील पार्किंग समस्या सुटणे कठीणच आहे, असे सिमरन प्रभू यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com