Morjim School Repair: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Goa Child Rights Commission: पोकेवाडा-मोरजी येथील शाळेच्या दुरुस्तीचे काम एक महिना उलटूनही हाती घेतले नसल्याने गोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी नाराजी व्यक्त केली.
Goa Child Rights Commission
Morjim School RepairDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: पोकेवाडा-मोरजी येथील शाळेच्या दुरुस्तीचे काम एक महिना उलटूनही हाती घेतले नसल्याने गोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी नाराजी व्यक्त केली.

शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या विषयाची गांभीर्याने दखल घेत सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याचे त्यांनी ठरविले आहे.या भेटीदरम्यान शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न तसेच अंगणवाडीसाठी केलेली व्यवस्था पुनाजी यांच्या निदर्शनास आली.

Goa Child Rights Commission
Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झाले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिनाभरानंतरही काम हाती घेतले नसल्याने शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. अंगणवाडीची व्यवस्था स्टेजवर करण्यात आली असून, ही व्यवस्था योग्य नसल्याचेही पुनाजी यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com