Indian Super League: चर्चिल ब्रदर्सला अखेरच्या क्षणी धक्का; पंजाब एफसीने 3-2 ने मारली बाजी

Churchill Brothers vs Punjab FC: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पंजाब एफसीने चर्चिल ब्रदर्सवर ३-२ असा नाट्यमय विजय मिळविला.
Churchill Brothers vs Punjab FC
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पंजाब एफसीने चर्चिल ब्रदर्सवर ३-२ असा नाट्यमय विजय मिळविला. सामन्याच्या भरपाई वेळेत गोल स्वीकारल्यामुळे गोव्यातील संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. कोंसम सनथोई सिंग याने ९०+५ व्या मिनिटास गोल करून पंजाब एफसीला विजय मिळवून दिला. पंजाब एफसीच्या राफेल मेस्सी बौली याने १३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. चर्चिल ब्रदर्सने ३७व्या मिनिटाला सेबॅस्टियन गुटिएरेझ याच्या गोलमुळे बरोबरी साधली.

Churchill Brothers vs Punjab FC
Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

मात्र, ४०व्या मिनिटास अल्फ्रेड प्लानास याने गोल करून पंजाब एफसीला पुन्हा आघाडीवर नेले. ४५+२ व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या गुटिएरेझने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून सामना २-२ असा बरोबरीत आणला. एक विजय व दोन पराभवांमुळे चर्चिल ब्रदर्सचे तीन गुण कायम राहिले, तर दोन विजय व एका बरोबरीमुळे पंजाब एफसीचे सात गुण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com