Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : उत्तर गोव्यातील खड्डेमय रस्त्यांबाबत काँग्रेस कार्यकर्ते छेडणार आंदोलन

भाजपा सरकारकडून लोकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यास अपयश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : उत्तर गोव्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालक हैराण झाले आहेत. या खराब रस्त्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत असून अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

ही दुरवस्था लक्षात घेत व निद्रिस्त सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी येत्या बुधवारपासून (ता.१९) उत्तर गोव्यातील प्रत्येकविधानसभा मतदारसंघात प्रशासन व साबांखाला जाब विचारण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन छेडले जाणार आहे.

म्हापशात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी वरील माहिती दिली. तसेच भाजपा सरकारकडून लोकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यास अपयश आल्याने त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. अ‍ॅड. शंशाक नार्वेकर व अतुल नाईक उपस्थित होते.साधला.

जनता दरबारात जाब विचारणार

येत्या दुसऱ्या जनता दरबारपर्यंत भाजीपाला व टोमॅटोचे दर आटोक्यात न आल्यास म्हापशात होणाऱ्या १४ ऑगस्ट रोजीच्या जनता दरबार कार्यक्रमस्थळी काँग्रेस शांततापूर्वक आंदोलन करून सरकारला जाब विचारणार असल्याचे भिके म्हणाले. तसेच, सरकारने जनता दरबाराद्वारे आपला टाईमपास बंद करावा, अशी कोपरखळी त्यांनी सरकारला मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Mapusa: भंगार वेचण्याच्या बहाण्याने आल्या, 'स्क्रू-ड्रायव्हर' घेऊन घुसल्या घरात; म्हापशात चोरीचा डाव उधळला; एका महिलेला अटक

SCROLL FOR NEXT