गोव्यात लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता अनेक दिवसांपासून ताणली असताना अखेर शनिवारी पक्षाने दोन्ही उमेदवारांची घोषणा केलीय. राज्यात काँग्रेसकडून काही उमेदवारांची नावे चर्चेत असताना ऐनवेळी खलप आणि फर्नांडिस यांची नावे समोर आलीयेत.
दक्षिणेत सार्दिन यांच्या नावाची चर्चा असताना त्यांचा पत्ता कट झाल्याने नाराज फ्रान्सिस बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यासह विजय भिके देखील नाराज असल्याचे समजतेय.
'काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने मी नाराज नक्की झालोय पण दु:खी नाही. जो व्यक्ती कधी एकही निवडणूक जिंकलेला नाही, त्या माणसाला काँग्रेसने उमेदवारी दिलीय.'
'मला उमेदवारी दिली असती तर मी नक्की विजयी झालो असतो. पुढील राजकीय वाटचालाची निर्णय माझ्या समर्थकांसह चर्चा केल्यानंतर घेईन,' अशी प्रतिक्रिया फ्रान्सिस सार्दिन यांनी दिली आहे.
दुसरीकडे उत्तरेतून उमेदवारी मिळेल अशी चर्चा असलेल्या विजय भिके यांचा देखील पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच काँग्रेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. याकार्यक्रमाला भिके आणि सार्दिन यांनी दांडी मारली.
(Congress Leader Vijay Bhike And Francisco Sardinha Are Hurt)
उत्तरेतून उमेदवारी मिळालेल्या रमाकांत खलप यांनी म्हादईचे संरक्षण, जमीन रुपांतरणाला रोखणे आणि गोव्याची ओळख जपणे हे मुद्दे काँग्रेससाठी सर्वोच्च प्राधान्य असतील, असे स्पष्ट केले. आपली भूमी आणि वारसा यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन देखील खलप यांनी केले.
देश आणि राज्यातील जनता भाजपच्या नेतृत्वाला कंटाळलीय, असे म्हणत गिरीश चोडणकर यांनी खलप आणि फर्नांडिस यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसकडून विचारपूर्वक चांगल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नेतृत्वाशी चर्चा करुन प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.