Illegal laterite stone  Dainik Gomantak
गोवा

Illegal stone Quarry : सांगेतील खाणीवर छापेमारी; नगरसेवकाचे धाबे दणाणले

तपास अधिकारी पोहोचू नयेत म्हणून ही लढवली शक्कल

दैनिक गोमन्तक

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी पथकाने आज सांगे परिसरातील खाणीवर छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार ही खाण सांगे नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रुमाल्डो फर्नांडीस यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईची चाहूल लागताच अधिकचे उत्खनन लपवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचं ही छापेमारी वेळी अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. त्यामूळे या कारवाईने नगरसेवकाचे धाबे दणाणले आहेत.

(South Goa Collector team have done a raid on Illegal laterite stone quarry in Costi Sanguem )

तपास अधिकाऱ्यांना छापेमारी वेळी खाण आवारात मशीन आणि ट्रकसाठी वापरल्या जाणार्‍या इंजिन ऑइलची बादली सापडली आहे. त्याच बरोबर खाणीतून निघालेले माल वाहून नेण्यासाठी वापरात असलेला ट्रक ही आढळला आहे. संशयितांनी तपास अधिकाऱ्यांना अधिकच्या उत्खनानाचा सुगावा लागु नये यासाठी मार्गावर अडथळे निर्माण करण्यात आले.

यासाठी झाडांच्या कापलेल्या फांद्या टाकून मार्ग अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तपास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोहोचत किती प्रमाणात खाणी खणल्या आहेत. याची माहिती घेतली आहे. यात राज्य सरकारच्या तिजोरीचेही मोठे नुकसान झाले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जर्विस फर्नांडिस यांच्या तक्रारीनंतर अधिकार्‍यांनी केली छापेमारी

कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जर्विस फर्नांडिस यांच्या तक्रारीनंतर अधिकार्‍यांनी छापेमारी केली आहे. जर्विस यांनी खाण खात्याकडून माहिती अधिकाराद्वारे माहिती विचारली होती, ज्यासाठी त्यांना खाणपट्टे नाहीत असे प्रमाणित उत्तर मिळाले होते. मात्र जर्विस यांनी याची सत्यता प्रशासनासमोर मांडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

तक्रारदारही आज घटनास्थळी हजर

या मालमत्तेवर खाण खात्याने आणि मामलदारांनी दोन दिवस आधी छापा टाकला आहे श्री. जर्विस फर्नांडिस यांच्या तक्रारीच्या आधारे, ही तक्रार उच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि परिपत्रक किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे करण्यात आली असल्याची माहितीही खाण विभागाने दिली आहे. या कारवाईमूळे मात्र सांगे परिसरातील अशा अवैध उद्योगांना चाफ बसण्यास मदत होणार आहे हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT