Goa Legislative Assembly : विरोधी पक्षनेतेपदी आमदार युरी आलेमाव

मी सर्व विरोधी आमदारांना विश्वासात घेवून गोमंतकीयांचा आवाज बुलंद करेन - युरी आलेमाव
MLA Yuri Alemao
MLA Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरानंतर गोव्याचा विरोधी पक्षनेता कोण? यावर चर्चा रंगल्या होत्या. याला आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण काँग्रेस नेते आमदार युरी आलेमाव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. याला सभापती रमेश तवडकर यांनी मान्यता दिल्याने यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

(MLA Yuri Alemav as Leader of Opposition in Goa Legislative Assembly)

याबाबत आलेमाव यांनी माध्यमांशी संवाद साधला असून सर्व विरोधी आमदारांना विश्वासात घेवून गोमंतकीयांचा आवाज बुलंद करेन असे गोवावासियांना आश्वासन दिले. ही आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्वासह असल्याचे आपण मानतो, लोकशाही आणि गोव्याची अस्मिता जपण्यासाठी समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करेन, सर्व विरोधी आमदारांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया स्वीकारेन सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्रखर विरोध करेन असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

MLA Yuri Alemao
Mining Leases : अखेर ठरलं! गोवा सरकारने 4 खाणपट्ट्यांसाठी काढली निविदा

विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी हे एक आव्हानात्मक काम

विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी हे एक आव्हानात्मक काम आहे, याची मला जाणीव आहे. मी माझे कर्तव्य बजावताना घटनातज्ज्ञ, माजी आमदार, विचारवंत, विविध विषयांवरील तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेईन, असे युरी आलेमाव यांनी सांगितले. तसेच मी सर्व समाजसेवी संस्था, उद्योग आणि व्यापारी संघटना आणि सामाजिक व सांस्कृतिक गटांशी त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी संवाद साधणार असल्याचं ही ते म्हणाले.

MLA Yuri Alemao
Pravin Arlekar : विकासकामे दर्जेदार करून घेणे ही पंचायतींची जबाबदारी

रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत सरकार अनभिज्ञ

गोमंतकीयांना आज विविध आघाड्यांवर कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या पर्यावरण, वारसा आणि अस्मिता धोक्यात आहे. रोजगार संधी निर्माण करण्याबाबत सरकार अनभिज्ञ असल्यामुळे बेरोजगारीचा दर वाढत आहे. सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध जनआंदोलन सुरू करणे हे माझे पहिले काम असेल, असे युरी आलेमाव म्हणाले.

गोव्याच्या हक्कांसाठी लढण्यासाठी मी सर्व विरोधी आमदारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न करेन. आपल्या मातृभूमीचे व गोमंतकीयांचे रक्षण करण्यासाठी आपण आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com