Damaged house Dainik Gomantak
गोवा

Goa Flood Compensation: अतिवृष्टीमुळे नुकसान संबंधित २९२ जणांना नुकसानभरपाई; व्‍यवस्‍थापन विभागातील अधिकाऱ्यांची माहिती

Goa Relief Fund: ही मदत दोन लाख रुपयांपर्यंत देण्‍यात आली असून नुकसानीचा आढावा घेतल्‍यानंतर ही सानुग्रह मदत किती द्यावी हे निश्‍चित करण्‍यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Compensation for rain flood damaged house

मडगाव: दक्षिण गोव्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीच्या संबंधित सुमारे २९२ सानुग्रह दावे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निकाली काढले आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

अतिवृष्‍टीमुळे यावेळी दक्षिण गोव्‍यात मोठ्या प्रमाणावर घरांच्‍या भिंती कोसळून घरांची पडझड होण्‍याच्‍या घटना घडल्‍या होत्‍या. त्‍यातील काही जणांनी दक्षिण गोवा जिल्‍हा प्रशासनाकडे आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्याखाली नुकसानभरपाईसाठी दावे केले होेते.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीशी संबंधित सुमारे २९२ सानुग्रह दावे निकाली काढले आहेत. केपे तालुक्‍यात ४६, सांगे तालुक्‍यात ५५, सासष्टी तालुक्‍यात ६६, काणकोण तालुक्‍यात २८, मुरगाव तालुक्‍यात ३६, धारबांदोडा तालुक्‍यात २१ आणि फोंडा तालुक्‍यात ४० अशाप्रकारचे सानुग्रह दावे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निकाली काढले.

जसे नुकसान तशी मदत!

ही सानुग्रह मदत दहा हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत देण्‍यात आली असून ज्‍याप्रमाणे नुकसान झाले त्‍याची तलाठ्यांकडून तपासणी करून नुकसानीचा आढावा घेतल्‍यानंतर ही सानुग्रह मदत किती द्यावी, हे निश्‍चित करण्‍यात आले. ज्‍या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली आहे. त्‍यात मडगावच्‍या तीन घरांचा समावेश असल्‍याची माहिती देण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT