South Goa  Dainik Gomantak
गोवा

South Goa : धार्मिक फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : सावियो कुतिन्हो

South Goa : भाजपच्या दक्षिणेतील पराभवाचे दुसरे कारण म्हणजे त्यांचे गणित चुकले. निवडणुकीनंतर पक्षाने त्यांच्या सर्व वीसही मतदारसंघातील प्रमुखांना किती ख्रिश्चन व मुस्लिमांनी मतदान केले यांचा आकडा तयार करण्यास सांगितला.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

सासष्टी, दक्षिण गोव्यातील पराभवाचे खापर धर्मगुरूंवर फोडण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम पराभव का झाला याचा पूर्ण अभ्यास करावा. लोकांमध्ये धार्मिक फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे मडगाव गटकाँग्रेसचे सावियो कुतिन्हो यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या दक्षिणेतील पराभवाचे दुसरे कारण म्हणजे त्यांचे गणित चुकले. निवडणुकीनंतर पक्षाने त्यांच्या सर्व वीसही मतदारसंघातील प्रमुखांना किती ख्रिश्चन व मुस्लिमांनी मतदान केले यांचा आकडा तयार करण्यास सांगितला. त्यांची जी मते पडली, त्यातील १० ते १५ टक्के मतदान भाजपला झाल्याचे त्यांचे गणित होते. पण ख्रिश्चन व मुस्लिमांनी केवळ काँग्रेस उमेदवारालाच मतदान केले, असा दावा भाजप करीत आहे, असे सावियो कुतिन्हो म्हणाले.

या पत्रकार परिषदेस एनेल आल्वारीस, लालन पार्सेकर, अन्वर नारू, कामिल कामारा, सुजाता पार्सेकर, डॉम्निक कुतिन्हो, इफ्तियाज सय्यद, दामोदर ओंसकर हे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या एक वर्षापूर्वीपासून भाजपचा ध्रुविकरणाचा व लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू होता. मात्र, गोवा व गोमंतकीय शांतीप्रिय आहेत. त्यामुळे गंभीर घटना घडल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT