Richest Candidate Pallavi Dempo Dainik Gomantak
गोवा

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

Richest Candidate Pallavi Dempo: दक्षिण गोव्यातून भाजपने उद्योगपती पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Pramod Yadav

Richest Candidate Pallavi Dempo

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या सात मे रोजी होत आहे. बारा राज्यातील 94 लोकसभा जागांसाठी सात तारखेला मतदान होईल. यात महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह इतर राज्यांचा समावेश आहे.

94 जागांसाठी 1,352 उमेदवार रिंगणात असून, विशेष बाब म्हणजे या सर्व उमेदवारांमध्ये पल्लवी धेंपे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

गोव्यातून दोन लोकसभा जागांसाठी भाजपकडून उत्तरेत श्रीपाद नाईक आणि दक्षिणेत पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून गोव्यात पहिल्यांदाच महिला उमेदवार देण्यात आला असून, पल्लवी या श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी आहेत.

पल्लवी धेंपे यांनी त्यांच्या शपथपत्रातून दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 255.44 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांचे पती श्रीनिवास धेंपे यांच्याकडे 998.83 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,361 कोटी एवढी होत असून, त्या तिसऱ्या टप्प्यातील देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

श्रीनिवास धेंपे गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. पल्लवी श्रीनिवास यांच्या पत्नी असून, त्‍यांनी पुण्‍यातील एमआयटीमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्‍ये पोस्‍ट ग्रॅज्‍युएशन केले आहे.

गोव्‍यातील विविध ठिकाणी व्‍यावसायिक मालमत्ता असण्‍याबरोबरच मुंबई, लंडन व दुबईमध्‍येही त्‍यांचे अपार्टमेंटस्‌ आहेत. गोव्‍यासह तामिळनाडू आणि चेन्नईत शेतजमीन आहे.

कोणत्या राज्यातून किती जागांसाठी होणार मतदान

बिहार - ५, आसाम- ४, छत्तीसगड-७, गोवा-२, गुजरात-२६, कर्नाटक-१४, मध्यप्रदेश- ८, महाराष्ट्र-११, उत्तरप्रदेश- १०, पश्चिम बंगाल- ४, जम्मू काश्मिर - १, दिव आणि दमण-२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT