Michelle Rebello 
गोवा

Goa Politics: 'बुलेट विसरा, प्रवाशांना लेट होतोय त्यावर बोला', पल्लवी धेंपेंच्या व्हिडिओवर मिशेल रिबेलोंची प्रतिक्रिया

Goa Politics: भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांची सोशल मीडिया हाताळणाऱ्या भाजपच्या टीमने अवास्तव दाखविणारे पोस्ट टाकू नयेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics

भाजप सरकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनात गेल्या 10 वर्षातील पूर्ण अपयशामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत, पावसात आणि उन्हाळ्यात त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांचे हाल दाखवणाऱ्या बातम्यांचा हा व्हिडिओ आहे. बुलेट विसरा आणि प्रवाशांना लेट होतो त्यावर बोला, अशी मागणी काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी केली आहे.

भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी प्रसारित केलेल्या बुलेट ट्रेनच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी गोव्यातील विविध रस्त्यांवर बंद पडणाऱ्या कदंबा बसेसच्या व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांची सोशल मीडिया हाताळणाऱ्या भाजपच्या टीमने अवास्तव दाखविणारे पोस्ट टाकू नयेत. असे केल्याने पल्लवी धेंपेनाच मनस्ताप सहन करावा लागेल असा टोला मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे. सूर्य आणि चंद्र आणून देण्याचे आश्वासन देण्यापूर्वी तिने जमिनीवरील वास्तवाचा अभ्यास केला पाहिजे असे मिशेल रिबेलो यांनी पुढे म्हटले आहे.

भाजप टीमने त्यांच्या हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो एक प्रकारे "महिला शक्ती" बाबत शंका दर्शवतो. त्याचवेळी सदर व्हिडिओ धावत्या ट्रेनच्या डब्यात चढण्यासाठी देखील प्रोत्साहन देतो. मोदींना सुपरमॅन म्हणून दाखवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते याचे हे उदाहरण आहे. मोदींची हमी हमीशिवाय आहे, असा टोला मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.

भाजप सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील अयशस्वी धोरणांमुळे जनतेला भोगाव्या लागलेल्या त्रासाबद्दल पल्लवी धेंपे बोलल्या तर मला त्याचे कौतुक वाटेल. प्रचार करताना त्यांनी सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करावा आणि लोकांच्या त्रासाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. मला आशा आहे की भाजप टीम पल्लवी धेंपेना ही संधी देईल, असे मिशेल रिबेलो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT