NCB Goa: सराईत नायजेरीयन ड्रग्ज तस्कर स्टॅनलीसह त्याच्या पत्नीची 1.06 कोटींची मालमत्ता जप्त

Narcotics Control Bureau Goa: गोवा अमली पदार्थ विरोधी विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
Goa NCB
Goa NCBDainik Gomantak

Narcotics Control Bureau Goa

सराईत नायजेरीयन ड्रग्ज तस्कर स्टॅनली आणि त्याची पत्नी उषा चंदेल यांची एक कोटी सहा लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गोवा अमली पदार्थ विरोधी विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

अमली पदार्थ विभागाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०२४ रोजी राजू नामक व्यक्तीला ७.३५ ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तपासाअंती राजू केवळ एक पेडलर असून, तो एका मोठ्या ड्रग तस्कर जाळ्याचा भाग असल्याचे समोर आले. या अमली पदार्थ तस्करीचे जाळे नायजेरीयन तस्कर स्टॅनली आणि त्यांची पत्नी उषा चालवत असल्याचे तपासातून उघड झाले होते.

दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी एनसीबी पथकाने कांदोळी येथून आणखी एक पेडलर मायकल (टॅक्सी चालक) याला ताब्यात घेतले होते. पथकाने स्टॅनलीच्या घरी छापा टाकला मात्र, तत्पूर्वी तेलंगण पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समोर आले.

Goa NCB
Goa Congress: गोव्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अर्ज केव्हा दाखल करणार? तारीख आली समोर

मास्टमाईंड स्टॅनली याची पत्नी उषा देखील या तस्करीत सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. उषा ड्रग्ज तस्करीतून मिळणारा पैसा आणि अमली पदार्थ तस्करीत सक्रिय असल्याचे उघड झाले होते.

पथकाने अखेर कारवाई करत पती पत्नीची एक कोटी ०६ लाख १० हजार ३७५ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com