South Goa beach news Dainik Gomantak
गोवा

Missing Tourists Goa: दक्षिण गोव्यातील किनाऱ्यावर नवविवाहिताची पत्नी गायब; 6 अल्पवयीन मुलांसह पर्यटकांना हुडकून काढण्यात पोलिसांना यश

Tourist Rescue Goa: दक्षिण गोव्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या साळगाव समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचे बेपत्ता होण्याचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे

Akshata Chhatre

मडगाव: गोवा हे राज्य प्रसिद्ध आहे. इथले समुद्र किनारे देशी तसेच विदेशी पर्यटकांना वेळोवेळी भरलं घालतात, मात्र पर्यटकांच्या याच गर्दीत काही खळबळजनक प्रसंग देखील घडले आहेत. दक्षिण गोव्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या साळगाव समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचे बेपत्ता होण्याचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे.

यंदाच्या वर्षी सुरुवातीपासून केवळ चार महिन्यांच्या कालावधीत, कोलवा पर्यटन पोलिसांनी सतर्कता दाखवत बेपत्ता झालेल्या आठ पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबांकडे पुन्हा पोहोचवण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे, सापडलेल्या आठ जणांमध्ये सहा अल्पवयीन मुलांचा समावेश होता.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, जयपूरहून हनीमूनसाठी गोव्यात आलेली २८ वर्षीय नवविवाहित पिंकी बन्सल दक्षिण गोव्यातील कोलवा किनाऱ्यावरून अचानक बेपत्ता झाली. पत्नीचा शोधत घेत असताना तिचा मोबाईल फोन बंद असल्याने तिच्या पतीची भीती आणि चिंता वाढली होती.

त्याने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर पिंकीचा शोध लागला आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आले.

साळगाव तालुक्यात कोलवा, बाणावली, वार्का, बेताळभाटी आणि केळशी यांसारखे प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. पोलीस नोंदीनुसार, पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोलवा किनाऱ्यावर बेपत्ता व्यक्तींच्या घटनांची संख्याही सर्वाधिक आहे.

पोलीस अशा घटनांबद्दल सतर्क असले तरीही पोलिसांनी पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांना एकटे सोडू नये आणि आपल्या सोबतची व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्वरित पर्यटन पोलिसांशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असा संदेश पोलिसांनी दिलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT