Betalbatim News: लोकांचा 'विरोध' तरीसुद्धा 'ना हरकत' दाखला का? बेताळभाटीत मेगा प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध

Betalbatim Mega Projects: बेताळभाटीत अनेक मेगा प्रकल्प सुरू आहेत. लोकांचा त्यास विरोध आहे. तरीसुद्धा पंचायतीतर्फे त्यांना ना हरकत दाखला दिला जातो. पंचायतीची या प्रकल्पांना मान्यता आहे का? असा प्रश्न माजी मंत्री व माजी आमदार मिकी पाशेको यांनी आज ग्रामसभेत उपस्थित केला.
Goa Mega Projects Criticizm
Goa Mega Projects Criticizm Canva|DG
Published on
Updated on

सासष्टी: बेताळभाटीत अनेक मेगा प्रकल्प सुरू आहेत. लोकांचा त्यास विरोध आहे. तरीसुद्धा पंचायतीतर्फे त्यांना ना हरकत दाखला दिला जातो. पंचायतीची या प्रकल्पांना मान्यता आहे का? असा प्रश्न माजी मंत्री व माजी आमदार मिकी पाशेको यांनी आज ग्रामसभेत उपस्थित केला. पंचायतीकडे मेगा प्रकल्पांविरोधात तक्रार केल्यास त्याची दखल घेण्यात यावी. मेगा प्रकल्पाच्या परवानगीसाठी आलेल्या सर्व फाईली ग्रामसभेसमोर ठेवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी मिकी पाशेको यांनी पंचायत क्षेत्रातील इतर समस्या उपस्थित करून मुबलक पाणीपुरवठा सुविधा, रस्त्यांची देखभाल, वेळोवेळी कचरा उचल यासंबंधीच्या सूचना पंचायत मंडळाला दिल्या.

आजच्या खास ग्रासमभेत राज्याबाहेरील लोक गावात येतात, जमिनी विकत घेतात व त्या परस्पर दुसऱ्यांना विकतात असे निदर्शनास आणून देण्यात आले. या जमिनी राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. राज्याबाहेरील लोकांना जमिनी विकू नयेत अशा पद्धतीचा कायदा गोव्यात हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, या ग्रामसभेला सासष्टी गटविकास अधिकारी पल्लवी मिश्रा उपस्थित होत्या. त्यांनी चर्चेत भाग घेऊन अनेक समस्यांची व प्रश्नांची दखल घेतली आहे.

Goa Mega Projects Criticizm
Cuncoliem News: कुंकळ्‍येवासीय एकवटले! भूखंड विक्रीस तीव्र विरोध; इशाऱ्याचा फलकच टांगला वेशीवर

सरकारला लिहिण्याचा ठराव

बेताळभाटी पंचायत क्षेत्रातील मेगा प्रकल्पांना स्थानिकांकडून विरोध होत असला तरी पंचायतीकडून प्रकल्प बंद केला जाऊ शकत नाही असे गटविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बेताळभाटीच्या खास ग्रामसभेत गोव्यासाठी नव्या प्रादेशिक आराखड्याची मागणीसुद्धा करण्यात आली. ज्या प्रकल्पांना विरोध आहे, त्याबाबत सरकारला पत्र लिहिण्याचे ग्रामसभेत ठरले. शिवाय कचरा व्यवस्थापन, जलप्रदूषण, पाणीपुरवठा, गुन्ह्यात होत असलेली वाढ या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mayde village gram sabha resolution
Goa Mega Job Fair 2026
Goa Water Metro Project
Oppose Mega Projects Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com