Betalbatim: मोकळ्या जागेत कचरा टाकल्यानं हॉटेलवर कारवाई; बेताळभाटी ग्रामपंचायतीचा स्वच्छतेवर भर

Betalbatim Gram panchayat: बेताळभाटी ग्रामपंचायतीने एका हॉटेलला मोकळ्या जागेत कचरा टाकल्याबद्दल दंड ठोठावला आहे.
Betalbatim
BetalbatimDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : बेताळभाटी ग्रामपंचायतीने एका हॉटेलला मोकळ्या जागेत कचरा टाकल्याबद्दल दंड ठोठावला आहे. तसेच त्या जागेवर साचलेला कचरा साफ करण्यासाठी आस्थापनाला १० दिवसांची मुदत दिली आहे.

बेताळभाटी पंचायत उपसरपंच इल्मा डायस यांनी पंचायत सचिवांसह हॉटेलच्या परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची अयोग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येत असल्याची दखल घेऊन त्याच्याविरुद्ध राबविण्यात आलेल्या मोहिमेचे नेतृत्व केले.

उपसरपंचांनी निदर्शनास आणून दिले की, हा कचरा खाडीला जोडलेल्या ठिकाणी टाकण्यात आला होता, जो शेवटी अरबी समुद्रात जाऊन मिसळू शकतो. तसेच काही प्रमाणात कचऱ्याची जाळपोळ करून विल्हेवाट लावण्यात आल्याचे समजल्यानंतर आम्ही हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Betalbatim
Nagpur-Goa Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाबाबत नवीन अपडेट, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधिमंडळात काय सांगितलं?

हा कचरा गेल्या अनेक महिन्यांपासून पडून असल्याचे दिसून आले. केवळ हे हॉटेल अनेक वर्षांपासून गावात व्यवसाय करत आहे आणि कचरा विल्हेवाटीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. या हॉटेलला पंचायतीने दोनदा ताकीद दिली होती.

आता आम्हाला त्यांना दंड ठोठवावा लागला असून त्यांना १० दिवसांत कचरा साफ करण्यास सांगण्यात आले आहे, असे डायस यांनी सांगितले. त्यांनी कबूल केले की, स्थानिक शेतकऱ्यांनी त्वचेच्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली असून हॉटेल्समधून सांडपाणी शेतात सोडण्याच्या प्रकाराचा याच्याशी संबंध असल्याचा त्यांना संशय आहे.

Betalbatim
Goa RERA: गोवा 'रेरा'चा दणका! रजिस्ट्रेशन न केल्यामुळे पणजीतील बिल्डरला 5 लाखांचा दंड

तीन प्रकल्प नाकारले

बेताळभाटी अशावेळी या समस्येचा सामना करत आहे, जेव्हा परिसरात अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित केले जात आहेत. आम्ही सध्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु अनेक प्रस्ताव येत आहेत. आम्ही नुकतेच तीन प्रकल्प नाकारले आहेत, असे डायस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com