Goa Tenant verification Dainik Gomantak
गोवा

'पर्यटकांना खोल्या, घरे भाड्याने देत असताना कागदपत्र तपासा'! द. गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सूचना; चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध

Goa Tenant Verification: एटीएम मशीन्‍सच्‍या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करावेत, मशीन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे क्‍लिटस यांनी जारी केलेल्‍या आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यातील पर्यटन हंगाम आणि गेल्‍या काही महिन्‍यांत घडलेल्‍या चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध झाले असून, पर्यटक किंवा इतर घरे भाड्याने देत असताना त्‍यांची मूळ कागदपत्रे हाती घ्‍यावी, त्‍यांच्याबाबतची माहिती स्‍थानिक पोलिस स्‍थानकाला द्यावी, अशा सूचना दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी एग्‍ना क्‍लिटस यांनी दिल्‍या आहेत. शिवाय, राष्‍ट्रीयीकृत बँकांच्‍या प्रभारींना एटीएम मशीनच्‍या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकाला तैनात करण्‍याचेही निर्देश त्‍यांनी दिले आहेत.

आपली घरे, इमारत, फ्‍लॅट, खासगी अतिथीगृहे भाड्याने देत असताना त्‍यांच्‍या मालकांनी तेथे निवासास येणाऱ्यांचे निवडणूक कार्ड, वाहन चालक परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट आदींसारखी कागदपत्रे ताब्‍यात घेऊन त्‍यांची पडताळणी करावी.

त्‍यानंतर त्‍याची माहिती आपल्‍या जवळच्‍या पोलिस स्‍थानकाला द्यावी आणि त्‍यानंतरच त्‍यांना भाड्याने ठेवून घ्‍यावे. तर, राष्‍ट्रीयीकृत बँकांनी आपल्‍या बँकांच्‍या एटीएम मशीन्‍सच्‍या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करावेत, मशीन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे क्‍लिटस यांनी जारी केलेल्‍या आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

दरम्‍यान, गेल्‍या काही वर्षांपासून राज्‍यातील चोरी, दरोड्याच्‍या घटनांमध्‍ये वाढ झालेली आहे. चोरट्यांनी राष्‍ट्रीयीकृत बँकांची एटीएम मशीन्‍स पळवून ती फोडल्‍याच्‍या घटनाही घडल्‍या आहेत. अशा बहुतांशी घटनांमध्‍ये भाड्याने राहण्‍यासाठी आलेल्‍यांचा सहभाग असल्‍याचे उघडकीस आलेले आहे. त्‍यामुळे जिल्‍हाधिकाऱ्यांनी ही पावले उचलल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT