mla cruz silva and locals against sunburn Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: सनबर्न आयोजकांविरुद्ध ‘एफआयआर’ची मागणी; आश्र्विन चंद्रू यांना निवेदन

Cruz Silva: सर्व विरोधी आमदार एकत्र असून ते कोणत्याही परिस्थितीत सनबर्नचे आयोजन करु देणार नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: आमदार क्रुझ सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांनी आज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू यांची भेट घेऊन त्यांना सनबर्न विरोधात निवेदन सादर केले.

किटला  येथे होऊ घातलेल्या सनबर्न महोत्सवाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. शिवाय परवानगी नसताना, जागा निश्र्चित झालेली नसताना सनबर्न महोत्सवाची तिकीट विक्री बेकायदेशीरपणे सुरू झाली आहे. त्यासाठी सनबर्न आयोजकांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सिल्वा म्हणाले, हा प्रश्र्न विधानसभेत चर्चेला  आला. या विषयावर सर्व विरोधी  आमदार एकत्र असून ते कोणत्याही परिस्थितीत सनबर्नचे आयोजन करु  देणार नाहीत. परवानगी नसताना, जागा निश्र्चित झालेली नसताना आयोजकांनी तिकीटविक्री सुरू केल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना अशा महोत्सवाला परवानगी देण्याचा अधिकार असतो. त्यामुळेच  आम्ही त्यांची  भेट घेतली असे एका कार्यकर्त्यानेसांगितले.

किटला गावात एक दोन किलोमीटरच्या घेऱ्यात कित्येक मंदिरे, चर्च, गोशाळा आहेत. बजरंग दल या परिस्थितीत का स्वस्थ आहे? असा प्रश्र्न सुद्धा एका कार्यकर्त्याने उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT