South Goa Crime Cases Dainik Gomantak
गोवा

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

South Goa crime report 2026: दक्षिण गोवा जिल्ह्यात यंदा जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत नोंद झालेल्या ६३४ गुन्ह्यांपैकी ५२५ गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दक्षिण गोवा जिल्ह्यात यंदा जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत नोंद झालेल्या ६३४ गुन्ह्यांपैकी ५२५ गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८२.८१ टक्के आहे.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही पोलिसांना यश मिळाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न आणि सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणांत शंभर टक्के तपास पूर्ण करण्यात आला आहे. या कालावधीत खुनाचे सहा गुन्हे नोंद झाले असून सर्व प्रकरणांची उकल करण्यात आली. बलात्काराच्या ३० गुन्ह्यांपैकी २८ प्रकरणांत संशयितांना अटक करण्यात आली, तर अपहरणाच्या ३९ गुन्ह्यांपैकी ३२ प्रकरणांचा तपास करण्यात आला.

दक्षिण गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, फोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे सर्वाधिक चार गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये नोंद झालेल्या सायबर फसवणुकीच्या ६४ गुन्ह्यांपैकी ३६ प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे.

गुन्ह्यांचा तपास करताना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक तपास पद्धती आणि विकसित तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT